आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचा वेळ कसा वाचवाल? 

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात बराच वेळ आपला ऑफिसच्या कामात आणि त्या कामाच्या ताणतणावात जातो. आपण फक्त ऑफिसचे कर्मचारी नसतो तर कुणाचे नातेवाईक, पालक, शेजारी, मित्र शिवाय माणूस असतो. पण आजच्या शहरी जीवनपद्धतीत आपण कुटुंबाला आपल्या नातेसंबधांना, जवळच्या लोकांना, शिवाय स्वत:ला पुरेपूर वेळ देऊ शकत नाही.ऑफिसच्या कामावरून घरी आल्यानंतर आपण प्रचंड थकलेलो असतो किंवा त्या कामाच्या ताणातचं असतो. पण जर आपण विचार केला तर छोट्या छोट्या गोष्टींत आपला प्रचंड वेळ वाया जात असतो. त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करुन तो वेळ स्वत:साठी आणि कुटुंबासाठी देऊ शकतो यासाठी योग्य ते नियोजन करणं गरजेचं आहे. वेळ वाया का जातो

 • आपल्या दैनंदिन वेळापत्रकावर एकदा नजर टाकली तर लक्षात येईल की अशी अनेक कामं आपण करत असतो की ज्यात आपण बहुतांश वेळ वाया घालवतो.
 • सोशल मीडिया याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. यासोबतच मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही यांचंही उदाहरण आपण घेऊ शकतो.
 • अनावश्यक फोन कॉल्स पण आपला खूप वेळ वाया घालवतात. दोन मिनिटांच्या कामासाठी अनेक वेळा तासन‌्तास आपणं फोनवर बोलत बसतो.

वेळ कसा वाचवायचा?

 • जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.
 • आपल्या ध्येयाशी संबंधित नसणाऱ्या, अनावश्यक कामांबद्दल सतर्क व्हा. त्यांच्यावर घालवत असलेला वेळ कमी कमी करत करा.
 • क्षुल्लक गोष्टी, ज्या कामांचा भावी आयुष्यात फारसा उपयोग होणार नाही, अशा गोष्टींपासून दूर राहायला शिका.
 • कामांच्या यादीत महत्त्वाची कामं कोणती आणि बाजूला सारता येण्यासारखी कोणती, हे ठरवा.

नियोजन करा...

 • सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
 • दिवसभरात कोणकोणती कामं करायची, याची आखणी मनाशी करायला हवी.
 • कामांची यादी आदल्या दिवशी झोपण्यापूर्वी किंवा सकाळी करता येईल.
 • कॅलेंडर किंवा कामाच्या वेळापत्रकाशी जुळवून घेत कामांची यादी करून आवश्यकतेनुसार त्यात बदलही करा.
 • कामाचं प्राधान्य लक्षात घेऊन, एकापाठोपाठ काम वेगानं उरका.

स्वत:साठी वेळ द्या...

 • रोज काही वेळ स्वतःसाठी आवर्जून राखून ठेवा. ध्यान, व्यायाम, स्वयंसूचना, वाचन.
 • छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. त्यांना थोडा वेळ द्या, ते तुम्हाला आनंद देतील.
 • जगण्यात मौज आहेच, पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.
 • आयुष्यात असं काहीतरी मिळवा, जे तुमच्यापासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
 • हसा, खेळा पण शिस्त पाळा.
 • “सुट्टी’ ही नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. तिचा योग्य वापर करा.
 • ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही, तो दिवस फुकट गेला असं समजा.
बातम्या आणखी आहेत...