आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढे नेऊ उजेडाचा वसा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीपोत्सवाच्या नुसत्या चाहुलीनेच प्रत्येक घराचं अन् मनाचं अंगण लख्ख होऊ लागतं ! नव्या उमेद नि उत्साहाची किरणं, आयुष्याला ग्रासणारी नैराश्याची जळमटं झटकून, तिमिराची तावदाने भेदत अगदी ‘आत’पर्यंत येऊ लागतात. उत्सवाच्या काळात असे मन प्रफुल्लित राहणे स्वाभाविक असले, तरी आपल्या सकारात्मक, सृजनात्मक वर्तणुकीतून इतरांना उल्हासित सहवासाची निरंतर अनुभूती देणारे अनेक जण आपल्या आसपास असतात. त्यांच्या प्रत्येक कृतीने आनंदाचा एक एक दीप तेवत जातो अन् आपल्याही आयुष्यात रोज दिवाळी साजरी होऊ लागते...  ‘मधुरिमा’च्या प्रत्येक अंकातून आपण एकमेकांच्या वाटेवर अशाच आनंदाचे दिवे लावत असतो. त्यात तुम्हा वाचकांचा सहभाग सर्वांत महत्वाचा. तुमच्या आशा-आकांक्षा, स्वप्ने अन् संकल्पनांसोबत आम्हीही समृद्ध होत असतो. इथं केंद्रस्थानी सदैव ‘ती’ आहे, कारण ती आहे म्हणूनच सर्वांच्या आयुष्याला अर्थ आहे. प्रत्येक क्षणाला नि सणाला ‘ती’च्याच तर अस्तित्वाचा स्पर्श आहे...   ‘ती’ आई, बहीण, पत्नी  ‘ती’ शक्ती, शांती, चेतना अंधाराची मग कसली भीती?  मनात पण‘ती’ असताना!  तर मग चला, उजेडाचा हा वसा आणखी पुढे नेऊ...   

बातम्या आणखी आहेत...