आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्याची मधुरिमा पहिली नेव्ही पायलट महिला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालपणापासूनच तिला विमानाचं खूप वेड होतं. तिचं हे विमानवेड तिच्यासोबतच लहानाचं मोठं झालं. एका ध्येयात बदललं. आणि आज तिनं याच विमान वेडामुळे इतिहास रचला. भारतीय नौदलातली पहिला महिला पायलट होण्याचा मान तिनं मिळवला. ती आहे, सब लेफ्टनंट शिवांगी स्वरूप. महिलांच्या दृष्टीनं मागास आणि असुरक्षित समजल्या जाणाऱ्या बिहारमधल्या मुझफ्फरपूरच्या शिवांगीनं बी.टेक. पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.भारतीय नौदल अकादमीच्या २७ एनओसी कोर्ससाठी तिची निवड करण्यात येऊन शिवांगी नौदलात दाखल झाली. सध्या तिची कोचीतील नौदलाच्या दक्षिण विभागात पायलट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जवळपास दीड वर्षाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर शिवांगीची या पदासाठी निवड करण्यात आली आहे. नौदलाच्या एव्हिएशन विभागामध्ये हवाई वाहतूक नियंत्रण विभागामध्ये महिला अधिकारी आहेत. बहुतांश महिला अधिकारी या ऑर्ब्झरव्हर म्हणून नियुक्त असतात. मात्र शिवांगीच्या रुपानं आता विभागातल्या महिलांना कॉम्बॅक्ट रोलही देण्यासाठीही नौदलानं पुढाकार घेतला आहे .   

बातम्या आणखी आहेत...