आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशात २० मंत्र्यांनी सीएम कमलनाथांकडे सोपवले राजीनामे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंगळुरूत राजीनाम्याचे फोटोसेशन : सिंधिया यांच्या गटातील १९ आमदार पाम मेडोज या पंचतारांकित हॉटेलात आहेत. राजीनाम्यांसह या सर्वांनी असा ग्रुप फोटो काढला. हा फोटो मध्य प्रदेशात पोहाेचताच काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. - Divya Marathi
बेंगळुरूत राजीनाम्याचे फोटोसेशन : सिंधिया यांच्या गटातील १९ आमदार पाम मेडोज या पंचतारांकित हॉटेलात आहेत. राजीनाम्यांसह या सर्वांनी असा ग्रुप फोटो काढला. हा फोटो मध्य प्रदेशात पोहाेचताच काँग्रेसमध्ये खळबळ उडाली.

भोपाळ/नवी दिल्ली - मध्य प्रदेशात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याला आणखी नवे वळण मिळाले. दुर्लक्ष केल्यामुळे नाराज असलेले काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंधियांचे समर्थक ६ मंत्री व १२ आमदारांचे फोन बंद आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कॅबिनेट बैठक बोलावली. ३ तासांच्या खलबतांनंतर रात्री ११.२५ वाजता मंत्री सज्जनसिंह वर्मा म्हणाले, २० मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे सोपवले आहेत. आपण त्यांच्यासोबतच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, भाजपने अापल्या सर्व आमदारांना भोपाळला बोलावले आहे. दिल्लीत शिवराजसिंह, नरोत्तम मिश्रांनी गृहमंत्री अमित शहांसोबत चर्चा केली. सिंधिया समर्थक मंत्र्यांसह १२ आमदारांना दिल्लीहून चार्टर्ड विमानाने बंगळुरूला पाठवले. पक्षाध्यक्षा सोनिया गांधींशी चर्चा केल्यानंतर सिंधिया पुढील पाऊल उचलतील, असे सांगण्यात येत आहे.

राज्यसभेमुळे सिंधियांची बंडखोरी?

आपल्याला पक्षाने राज्यसभेत पाठवावे अशी सिंधियांची इच्छा आहे. मात्र पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी याप्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. याबाबत कमलनाथच निर्णय घेतील असे सोनियांनी सांगितले आहे.

  • राजीनाम्यांनंतर रिकाम्या झालेल्या जागांवर लवकरच होईल पोटनिवडणूक
  • ३ मार्च... दिग्विजयसिंहांचा आरोप - भाजपने काँग्रेस आमदारांना डांबून ठेवले

सत्तेत असूनही तब्बल २२ आमदारांनी एकाचवेळी राजीनामा द्यावा, असे बहुधा मध्यप्रदेश सरकारच्या इतिहासात पहिल्यांदाच होत असावे. कमलनाथ यांच्या सरकारला बसपाचे दोन आणि समाजवादीचे एका आमदारानेही भाजपला पाठिंब्याचे संकेत दिले आहेत. बसपाचे संजीव कुशवाह आणि सपाचे राजेश शुक्ल यांनी शिवराज सिंह चौहान यांच्या निवासस्थानी भेट घेतली. रात्री उशिराच्या आमदारांच्या बैठकीस २५ आमदार अनुपस्थित असतील.

अंतिम मंथन... बैठकीला एआयसीच्या सचिवांची उपस्थिती

काँग्रेस आमदारांच्या बैठकीस ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव सुधांशू त्रिपाठी यांना निरीक्षक म्हणून पाठविण्यात आले आहे, जे संध्याकाळच्या बैठकीस उपस्थित असतील. यापूर्वी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मंत्री आणि आमदारांचे येणे चालूच होते. यात बाला बच्चन, तरुण भनोत, लाखन सिंह यादव, प्रियव्रत सिंह, उमंग सिंघार, चंद्रभागा किराडे, रवी जोशी, ग्यारसीमल रावत यांच्यासह अनेकांचा समावेश होता. लाखन यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले की, बेंगळुरूमध्ये थांबलेल्या आमदारांशी माझे बोलणे झाले आहे. त्यातील बहुतांश जणांनी सांगितले की, त्यांना बंेगळुरूला का नेले जात आहे, हे सांगण्यात आले नव्हते. यापैकी बहुतांश आमदार काँग्रेसमध्येच राहतील आणि सरकार सुरक्षित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रियव्रत सिंह यांनीही सरकारला धोका नसल्याचे सांगितले.

स्वकींयाकडूनच मिळाला धडा...लक्ष्मणसिंह म्हणाले, आता आम्हाला विरोधात बसण्याची तयारी केली पाहिजे

दिग्विजय सिंह यांचे भाऊ व काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सिंह म्हणाले, की आता आम्हाला विरोधात बसण्याची गरज नाही. पूर्ण ताकदीने लढू आणि आवाज उठवू. जनतेला सांगू की, आम्हाला पाच वर्षांची संधी मिळाली असती, पण मिळाली नाही. का व कसे झाले, यावर चर्चा करणे व्यर्थ आहे.

राजीनाम्यांनंतरची भीती... बंडखोर आमदारांनी कर्नाटकात मागितले संरक्षण 

काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी कर्नाटकच्या पोलिस महासंचालकांना पत्र लिहून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ते स्वेच्छेने एका महत्त्वाच्या कामासाठी कर्नाटकात आले आहेत. बेंगळुरूत राहण्यासाठी आणि फिरण्यासाठी आम्हाला स्थानिक पोलिसांचे संरक्षण हवे आहे. या पत्रावर बेंगळुरूत असलेल्या १९ आमदारांच्या सह्या आहेत.

महाराज के साथ... अनेक समर्थकांनीही सोडला काँग्रेसचा हात

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर समर्थकांनीही राजीनामे देण्यास सुरुवात केली. काँग्रेसचे इंदूर जिल्हाध्यक्ष प्रमोद टंडन, प्रदेश प्रवक्ते पंकज चतुर्वेदी, ग्वाल्हेर ग्राणीणचे जिल्हाध्यक्ष मोहन सिंह राठोड, युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष पवन जयस्वाल यांच्यासह ग्वाल्हेर - चंबल भागातील सिंधियांच्या अनेक समर्थकांनी राजीनामे दिले आहेत. जेथे सिंधिया तेथे मी, असे राजीनामा दिल्यावर चतुर्वेदी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...