आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार संकटात; ६ आमदार परतले, ४ जण अजूनही बेपत्ताच

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • १५ ते २० आमदार संपर्कात असल्याचा भाजपच्या माजी मंत्र्यांचा दावा

भोपाळ- मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारवरील राजकीय संकट बुधवारी काहीसे हलके झाले. गुरगाव-दिल्लीत २४ तासांच्या घडामोडींनंतर भाजपच्या संपर्कातील आपले ६ आमदार परत आणण्यात काँग्रेसने यश मिळवले. त्यांना दोन चार्टर्ड विमानांनी भोपाळला आणले गेले. मात्र भाजपने आमचे चार आमदार बंगळुरूत नेल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 


काँग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले, सरकार पाडण्याच्या भाजपच्या खटाटोपाचा पर्दाफाश झाला आहे. इतर आमदारही लवकरच परत येतील. दरम्यान, भाजपचे माजी मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी अद्याप १५ ते २० आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. २८८ आमदारांच्या विधानसभेत बहुमतासाठी ११५ आमदार गरजेचे आहेत. काँग्रेसचे ११४ तर भाजपचे १०७ आमदार आहेत. तसेच ४ अपक्षांपैकी एकाला मंत्रिपद देण्यात आलेले आहे.