आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोपाळ- मध्य प्रदेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय ड्राम्यामध्ये सोमवारी मोठी उलथा-पालथ समोर आली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया गटाच्या 7 मंत्र्यांसह 17 आमदार दिल्ली आणि बंगळुरात पोहचले आहेत आणि त्यांचे फोनही बंद आहेत. ही माहिती मिळताच मुख्यमंत्री कमलनाथ दिल्लीतून भोपाळला परतले आहेत. राज्यातील सरकारची अस्थिरता पाहता भाजप विधानसभेच्या अधिवेशनात कमलनाथ सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर करू शकते. या संकटाला टाळण्यासाठी काँग्रेस ज्योतिरादित्य सिंधिया यांना प्रदेशाध्यक्ष किंवा राज्यसभा सदस्य बनवू शकते.
या मंत्री आणि आमदारांचे फोन बंद
मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर, महेंद्र सिंह सिसोदिया, तुलसी सिलावट, इमरती देवी, गोविंद सिंह राजपूत, प्रभुराम चौधरी आणि उमंग सिंघार बंगळुरला गेलेत. भास्करने यांच्याशी संपर्कर साधण्याचा प्रयत्न केल्या, त्यांचे फोन बंद आले. तसेच, आमदार ओपीएस भदौरिया, जसवंत जाटव यांचेही मोबाइल बंद आहेत. बंगळुरूच्या बाहेरील परिसरात या आमदारांना ठेवण्यात आले आहे. येथे 400 पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
कमलनाथ यांनी सिंधियाबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही
मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सोमवारी दिल्लीमध्ये सोनिया गांधींची भेट घेतली. भेटीनंतर कमलनाथ म्हणाले की, सोनिया गांधींसोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करेल. ज्योतिरादित्य सिंधिया यांना राज्यसभेत पाठवण्याच्या प्रश्नावर कमलनाथ यांनी उत्तर दिले नाही.
मागच्या महिन्यात सुरू झाला वाद
कमलनाथ आणि सिंधिया यांच्यात फेब्रुवारीमध्ये घोषणापत्रावरुन वाद सुरू झाला. सिंधिया म्हणाले होते की, "घोषणापत्रात दिलेली वचने पुर्ण न झाल्यास, रस्त्यावर उतरले." यावर मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले होते- "उतरा..." त्यावेळेसही मुख्यमंत्री काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना भेटले होते आणि सिधिंया यांच्या सरकारविरोधी भूमिकेची नाराजी व्यक्त केली होती.
मध्य प्रदेशमध्ये 26 मार्चला राज्यसभेच्या 3 जागांसाठी, क्रॉस वोटिंगचा संशय
26 मार्चला मध्य प्रदेशात राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होणार आहेत. कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी 58 आमदारांच्या समर्थनाची गरज आहे. काँग्रेसकडे आपल्या 114 आमदारांशिवाय सपा-बसपा आमि अपक्षासह 121 आमदार आहेत. अशात काँग्रेसला दोन जागा मिळू शकतात. तर, दुसरीकडे 107 जागा असलेल्या भाजपचा एका जागेवर विजय निश्चित आहे. यातच भाजप दोन जागांवर उमेदवार उतरवण्याची तयारी करत आहे. यातच काही आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे दोन्ही पक्षांना फायदा किंवा नुकसान होऊ शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.