आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता चर्चा : नाथ वाचणार की कमळ उमलणार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशच्या निवडणूक मतदान यज्ञात एक आहुती पडली असून तीन आहुत्या बाकी आहेत. दुसरी आहुती 17 व पूर्णाहुती 24 एप्रिलला पडेल. 10 एप्रिल रोजी ज्या नऊ जागांवर मतदान झाले त्यापैकी छिंदवाडा येथील कमलनाथ यांची जागा पक्की मानली जात होती. परंतु आता असे वाटत नाही. मतदानाच्या टक्केवारीत झालेल्या ऐतिहासिक वाढीमुळे काँग्रेसची अवस्था अधिकच नाजूक झाली आहे. असे म्हटले जाते की, जागरूकतेमुळे मतदानाचा टक्का वाढला. परंतु याचे खरे कारण लोकांमध्ये असलेला राग हेच आहे. विद्यमान केंद्र सरकारविरुद्ध राग, घोटाळे, अपहार व त्यावर तब्बल दहा वष्रे पंतप्रधानांनी धारण केलेले मौन याविरोधात मतदारांत असंतोष आहे. छिंदवाडाच्या जागेवर गेल्या निवडणुकीत 71 टक्के मतदान झाले होते. या वेळी तिथे 79 टक्के मतदान झाले आहे. या वाढत्या आठ टक्क्यांनी कमलनाथ यांची झोप उडाली आहे. ठोसपणे कुणीच सांगू शकत नाही की त्यांचे काय होणार? परंतु विश्लेषकांचे म्हणणे असे की कमलनाथ पराभूत जरी नाही झाले तरीही त्यांची गतवेळची सव्वा लाखांची लीड नक्कीच कमी होईल.

संपूर्ण मध्य प्रदेशातील निकालांबाबत अंदाज लावायचा झाला तर काही जागांवर बदल नक्कीच झाला आहे. या कॉलममध्ये प्रथम काँग्रेसच्या खात्यात पाच ते सात जागा जाताना दिसत होत्या. दुसर्‍यांदा ही संख्या घटून पाचवर आली होती. तिसर्‍यांदा यात किरकोळ बदल दिसत असून रीवामध्ये भाजपची परिस्थिती सुधारली आहे. परंतु रीवाचे कन्फ्यूजन केंद्र सतनाला हलले आहे. सतनामध्ये बसपने जातकार्ड फेकले असून ब्राrाण उमेदवारास तिकीट दिले आहे. परंतु ब्राrाण उमेदवार जसा काँग्रेसला अडचणीचा ठरू शकतो, तसाच भाजपलाही. सागरच्या सीटबाबत बोलायचे झाले तर ही जागा आधीपासून संभ्रमाची वाटत होती. आधी येथे काँग्रेसचा विजय नक्की मानला जात होता. परंतु आता तशी स्थिती नाही. येथे तिरंगी लढत रंगली आहे. त्यामुळे काहीही होऊ शकते.

एकूणच गेल्या आठवड्यापर्यंत काँग्रेसच्या पारड्यात पाच जागा जाताना दिसत होत्या. परंतु या संख्येत घट होऊन आता चार किंवा पाच अशी झाली आहे. म्हणजे काँग्रेस चारपर्यंतच अडखळू शकते. पुढील आठवड्यात 17 एप्रिल रोजी राज्यात दहा जागांवर मतदान होईल. तेव्हा परिस्थिती आणखी बदलेल. शक्य आहे, की काँग्रेसच्या परिस्थितीत थोडाफार बदल होईल किंवा भाजप ऐतिहासिक विजयाची नोंद करेल. 16 मे रोजी कुणाच्या पारड्यात आनंद आणि कुणाच्या वाट्याला दु:ख येईल, याचे उत्तर काळच देईल.

लेखक मध्य प्रदेशचे स्टेट एडिटर आहेत.