आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप व काँग्रेसने मध्य प्रदेशात 30%,राजस्थानात 15% जागांवर नेत्यांच्या कुटुंबीयांना दिली तिकिटे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

>म.प्र. च्या २३० जागांपैकी भाजपने ४८, तर काँग्रेसने २३ जागांवर भाऊ-भाचा, मुलगा, सुनेला दिले तिकीट

>राजस्थानात काँग्रेसने २० व भाजपने १० जागांसाठी  राजकीय पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना दिले तिकीट

 

भोपाळ - राजकारणात कुटुंबवाद व वंशवादावर प्रत्येक पक्ष बाेलताे; परंतु यावर स्वत: अंमलबजावणी करणे मात्र विसरतात. यात विशेषत: भाजप, जाे कुटुंबवादावर विराेधी पक्षांवर नेहमीच टीका करत असताे. या वेळी विधानसभा निवडणुकांत भाजप व कांॅग्रेस या दाेन्ही पक्षांनी भाऊ, भाचा, मुलगा, सून अादींना भरभरून तिकिटे दिलीत. मध्य प्रदेशात भाजप व राजस्थानात कांॅग्रेस कुटुंबवादास पुढे नेत अाहेत. मध्य प्रदेशात २३० जागांपैकी भाजपने सुमारे २० % व कांॅग्रेसने १० % तिकिटे अापापल्या पक्षातील नेत्यांच्या कुटुंबीयांना दिलीत. राजस्थानात २०० जागांपैकी कांॅग्रेसने १० % व भाजपने ५ % जागांवर त्यांच्या नेत्यांच्या कुटुंबीयांना तिकिटे दिली असून, अशीच काहीशी स्थिती निवडणूक हाेणाऱ्या इतर राज्यांतही अाहे.

 

मध्य प्रदेश : राज्यात ६८ जागांवर राजकीय कुटुंबांशी संबंधित चेहरे 

राज्यात भाजप-काॅंग्रेसने ७१ जागांवर कुटुंबवादालाच स्थान दिले अाहे. हे ७१ उमेदवार ६८ वेगवेगळ्या जागांवर रिंगणात अाहेत. म्हणजे, राज्यातील ३० % जागांवर कुटुंबवादाचेच वर्चस्व अाहे. तसेच भाजपने २३० पैकी ४८ तिकिटे त्यांच्या नेत्यांचे भाऊ, बहीण, सून, मुलेे, पत्नी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना दिलेत. त्यातील ३४ मुले-मुलांना, तर १४ तिकिटे कुटुंबातील इतरांना मिळाली. काॅंग्रेसनेसुद्धा २३ तिकिटे त्यांच्या नेत्यांच्या कुटुंबीयांनाच दिली अाहेत. त्यापैकी १४ तिकिटे मुले-मुली व ९ इतर सदस्यांना दिलीत.

 

माेठे नाव : दिग्विजय यांच्या कुटुंबातील तिघांसह विजयवर्गीयांचे पुत्र, बाबुलाल यांच्या सुनेला तिकीटभाजपने कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आकाश, माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर यांची सून कृष्णा गौर यांना तिकीट दिले अाहे. तसेच काॅंग्रेसने दिग्विजय सिंहांच्या कुटुंबातील ३ सदस्यांना तिकीट दिले असून, काॅंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरुण यादव, खासदार कांतीलाल भुरियांच्या कुटुंबातील २-२ लोकांनाही तिकिटे दिलीत. 

 

तेलंगण : टीआरएसमध्ये सीएम राव यांच्या कुटुंबातील तिघे मैदानात टीआरएसचे अध्यक्ष व तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राज्यातील ११९ पैकी सुमारे २० % तिकिटे पक्षातील नेत्यांच्या कुटुंबीयांना दिलीत. स्वत: राव यांच्याशिवाय त्यांचे पुत्र के.टी.रामाराव, भाचा हरीश राव तसेच कांॅग्रेसच प्रदेशाध्यक्ष उत्तमकुमार रेड्डी व त्यांची पत्नी पद्मावती रेड्डीदेखील निवडणुकीच्या मैदानात अाहेत. काॅंग्रेसचे भाटी विक्रामारका (कार्यकारी अध्यक्ष) यांचे भाऊ मल्लू रवी हेसुद्धा रिंगणात अाहेत. 

 

राजस्थान : प्रत्येक निवडणुकीत तिकीट मिळवणारी १६ कुटुंबे

राजस्थानात काॅंग्रेसने कुटुंबवादाबाबत भाजपला मागे साेडले अाहे. राज्यात भाजप व काॅंग्रेसने ३० जागांवर अापल्याच नेत्यांच्या कुटुंबीयांना तिकिटे दिली अाहेत. म्हणजे, सुमारे १५ % जागांवर कुटुंबवाद वरचढ ठरला अाहे. काॅंग्रेसने २० व भाजपने १० जागांवर अापापल्या पक्षातील नेत्यांच्या कुटुंबीयांना तिकिटे दिली. राज्यात १७ अशी राजकीय कुटुंबे अाहेत, ज्यांना गत ३-४ निवडणुकांपासून तिकीट दिले जातेय. या वेळीही मिळाले. यावरून अनेक जागी दोन्ही पक्षांतील इतर इच्छुक व त्यांच्या समर्थकांनी निदर्शनेही केली अाहेत. 

 

माेठे नाव : काँग्रेसने भाजप नेते जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांना दिले तिकीट
काॅंग्रेसने भाजप नेते व माजी परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह, महिपाल मदेरणा यांची कन्या दिव्या, शिशराम ओलांचे पुत्र ब्रजेंद्र आदी दिग्गजांना तिकिटे दिली अाहेत. तसेच भाजपने किरोडीलाल मीणांची पत्नी गोलमादेवी, माजी मंत्री सांवरलाल जाट यांचे पुत्र रामस्वरूप आदी दिग्गजांना तिकिटे दिलीत.

बातम्या आणखी आहेत...