आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Madhya Pradesh: Jyotiraditya Scindia Resigns From Congress, Social Media Reaction News And Updates On Mp Politics

'अशा लोकांनी पक्ष सोडून गेलेलं बरं', ज्योतिरादित्य सिंधियांच्या राजीनाम्यावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची प्रतिक्रीया

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिंधियांनी 10 मार्चला ट्विटरवर आपल्या राजीनाम्याची प्रत पोस्ट केली, त्यावर तारीख 9 मार्चची आहे

नवी दिल्ली/भोपाळ- ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राजकीय भूकंप केला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्याची कॉपी आज(मंगळवार) ट्विटरवर पोस्ट केली. पण, त्या राजीनाम्यावर तारीख 9 मार्चची आहे. म्हणजेच त्यांनी कालच राजीनामा देण्याचे ठरवले होते. सिंधिया यांच्या राजीनाम्यावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, "त्यांनी विश्वासघात केलाय. अशा लोकांनी लवकर पक्ष सोडलेलं बरं." 

अशोक गहलोत यांनी सिंधिया यांच्या जाण्यावर दुख आणि आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की,  “अशा वेळी, जेव्हा भाजप देशाची अर्थव्यवस्था, सामाजिक स्थिती आणि न्यायव्यवस्थेला उद्धवस्त करत आहे, त्यांचे समर्थन करणे, हे स्वार्थाचे राजकारण नाही तर काय आहे? सिंधियांनी जनतेचा विश्वासघात केला. अशे लोक सत्तेचे भुकेले असतात आणि यांनी लवकर पक्ष सोडलेला बरा."