आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Madhya Pradesh" Jyotiraditya Scindia's Grandmother Vijay Raje Dropped The Congress Government 53 Years Ago

53 वर्षांपूर्वी विजयाराजे सिंधियांनी काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढले होते, आता नातू ज्योतिरादित्य यांनी सरकारला संकटात आणले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1967 मध्ये विजयाराजेंनी लोकसभा-विधानसभा निवडणुकीपुर्वी काँग्रेस सोडून अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकली
  • निवडणुकीनंतर 36 काँग्रेस आमदार पक्ष सोडून विजयाराजेंसोबत आले, सीएम डीपी मिश्रा यांची सरकार कोसळली होती

भोपाळ- मध्य प्रदेशच्या राजकारणात सिंधिया कुटुंब 53 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करत आहे. 1967 मध्ये विजयाराजे सिंधिया यांच्यामुळे काँग्रेसला सत्ता गमवावी लागली होती, आता त्यांचे नातू ज्योतिरादित्य यांच्यामुळे कमलनाथ सरकार संकटात सापडली आहे.

1967: विजयाराजे यांना डीपी मिश्रांनी 15 मिनीटे वाट पाहायला लावली, काँग्रेसला याची किम्मत मोजावी लागली.


1967 मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये डीपी मिश्र मुख्यमंत्री होते. ग्वालियरमध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत विजयाराजे यांचा मिश्रा यांच्यासोबत वाद झाला. 1967 मध्येच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होणार होत्या. तिकीट वाटप आणि विद्यार्थी आंदोलनानिमित्त विजयाराजे पचमडीमध्ये झालेल्या काँग्रेस युवक सम्मेलनात आल्या होत्या. या सम्मेलनाचे उद्घाट इंदिरा गांधी यांनी केले होते.

मध्य प्रदेशमधील जेष्ट पत्रकार विजयधर श्रीदत्त सांगतात की, ''पचमडीमध्ये डीपी मिश्रांनी विजयाराजेंना 15 मिनीट वाट पाहायला लावली होती. विजयाराजे यामुळे अपमान झाल्यासारखे वाटले आणि त्या नाराज झाल्या. त्यानंतर विजयाराजेंनी विद्यार्थ्यांवर झालेल्या गोळीबाराचा मुद्दा उचलला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ग्वालियर एसपीला हटवण्याची मागणी केली. पण, मुख्यमंत्र्यांनी त्यांचे म्हणने ऐकले नाही.'' या घटनेनंतर निवडणुकीपूर्वीच विजयाराजेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि गुना मतदारसंघातून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या. निवडणुकीनंतर काँग्रेसच्या 36 आमदारांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या समर्थनावर विजयाराजेंनी सतनाच्या गोविंदनारायण सिंह यांना मुख्यमंत्रीपदावर बसवले. अशा रितीने पहिल्यांदा मध्यप्रदेशमध्ये बिगर काँग्रेस सरकार सत्तेत आली.

2020: ज्योतिरादित्य सिंधिया यांनी रस्त्यावर उतरण्याची धमकी दिली, कमलनाथ म्हणले- उतरा रस्त्यावर


13 डिसेंबर 2018 ला राहुल गांधींनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याऐवजी कमलनाथ यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ज्योजिरादित्य आणि कमलनाथ यांच्यात वाद वाढत गेला. ज्योतिरादित्य यांनी अनेकवेळा सरकारवर निशाना साधला. त्यांनी ऑगस्ट 2019 ला जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्याचे समर्थन केले. त्यानंतर यावर्षी फेब्रुवारीमध्ये घोषणापत्रातील वचन पूर्ण न केल्यामुळे त्यांनी रत्यावर उतरण्याची भाषा वापरली. त्यावर कमलनाथ म्हणाले- उतरा रस्त्यावर. हीच गोष्ट ज्योजिरादित्य यांना खटकली. 
 
9 मार्चला कमलनाथ राज्यसभा निवडणुकीबाबत सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले. त्यानंतर माध्यमांनी त्यांना राज्यसभेवर ज्योजिरादित्य यांना पाठवण्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर कमलनाथ म्हणाले की, यावर कोणतीच चर्चा झाली नाही. त्यानंतर काही तासातच मध्यप्रदेश सरकारमधील 17 आमदार बंगळुरूला गेले. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच आज 20 काँग्रेस आमदारांनी राजीनामा दिला.