आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Madhya Pradesh : Kamal Nath Showed A Majority Within 7 Hours After BJP's Challenge

डाव उलटवला : भाजपच्या आव्हानानंतर कमलनाथ यांनी ४ तासांतच बहुमत दाखवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकार पडल्यामुळे उत्साहित झालेल्या भाजपला बुधवारी मध्य प्रदेशात धक्का बसला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना आव्हान दिले की, पक्षश्रेष्ठींचा आदेश मिळाला तर २४ तासांत राज्य सरकार संकटात सापडू शकते. त्यानंतर चार तासांतच एका विधेयकावर मतदानाच्या निमित्ताने कमलनाथ सरकारने आपले मजबूत संख्याबळच दाखवले नाही, तर भाजपच्या दोन आमदारांनीही सरकारच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केले. नारायण त्रिपाठी आणि शरद कौल अशी या आमदारांची नावे असल्याचे कळते. त्यानंतर काँग्रेसने दावा केला की, भाजपचे अनेक आमदार मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या संपर्कात आहेत.


विधानसभेत एका विधेयकावर बसपच्या संजीवकुमार सिंह यांनी मतदानाची मागणी केली होती. भाजपने विरोध केल्यानंतरही ते अडून राहिले. मतदान झाले तेव्हा विधेयकाच्या बाजूने १२२ मते पडली. भाजप मतदानात सहभागी झाला नाही. काँग्रेस आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांनी मतदान केले नाही.
नंतर विधिमंडळ कामकाज मंत्री गोविंद सिंह यांनी सभागृहात सांगितले की, भाजपच्या दोन सदस्यांनी सरकारच्या बाजूने मत दिले आहे. या घटनेनंतर भाजप बॅकफूटवर आला. सभागृहात उपस्थित माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान काहीही बोलले नाहीत. मात्र, भार्गव म्हणाले की, मतदानाची तपासणी केली तर ११ आमदार असे मिळतील, ज्यांनी दोन वेळा स्वाक्षरी केली. भाजपचे मुख्य प्रतोद आणि ज्येष्ठ आमदार नरोत्तम मिश्रा म्हणाले की, फोडाफोडीबाबत भाजपनेे विचार केला नाही. पण ती काँग्रेसने सुरू केली आहे. कदाचित भाजप ती संपवेल. 


असे होते मतदानाचे गणित
काँग्रेसचे ११३, बसपचे २, सपचे १ आणि चार अपक्षांसह भाजपच्या दोन आमदारांनीही मत टाकले. त्यांची एकूण संख्या १२२ झाली. २३० सदस्यांच्या विधानसभेत सध्या २२९ सदस्य आहेत. काँग्रेसचे ११४, भाजपचे १०८, बसपचे २, सपचा १ आणि चार अपक्ष सदस्य आहेत. सभागृहात स्पष्ट बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला ११६ आमदारांची आवश्यकता आहे.
 

भाजपचे व्यवस्थापन पूर्णपणे अयशस्वी
मतविभागणीच्या वेळी भाजपचे फ्लोअर मॅनेजमेंट पूर्णपणे अयशस्वी ठरले. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आणि अखेरच्या दिवशी कुठलाही व्हिप जारी झाला नाही. पक्षाचे अनेक आमदार सभागृहात हजर नव्हते. यशोधरा राजे, कृष्णा गौर, मालिनी गौड, उषा ठाकूर यांच्यासह भाजपचे अनेक आमदार अनुपस्थित होते. 

 

क्रॉस व्होटिंग करणारे भाजप आमदार म्हणाले-आमची घरवापसी झाली, कमलनाथ आमचे आयकॉन आहेत

‘भाजपत उपेक्षित वाटत होते. शिवराज यांनी माझ्या मतदारसंघात ज्या घोषणा केल्या त्यावर काम झाले नाही. आज जनतेला उत्तर देणे कठीण होत होते. काँग्रेस हे माझे जुने घर आहे. मी माझ्या घरी परतलो आहे. जो कोणी भाजपमध्ये आला तो राजकारणायोग्य राहणार नाही.
नारायण त्रिपाठी, भाजप आमदार, मैहर

 

‘कमलनाथ आमचे आयकॉन राहिले आहेत. काँग्रेसमध्ये आधीपासून होतो, आता आम्ही घरवापसी केली आहे. आम्ही निवडणूक जिंकली आहे. मतदारसंघाचा विकास हाच आमचा उद्देश आहे.  आम्हाला कमलनाथ यांच्या नेतृत्वात विकासाचा दृष्टिकोन दिसत आहे.
शरद कौल, भाजप आमदार, ब्यौहारी

बातम्या आणखी आहेत...