आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Madhya Pradesh Political Development | Jyotiraditya Scindia Resign From Congress Party Latest News And Updates

मोदींच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य सिंधियांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; 11 ते 13 मार्चदरम्यान भाजपमध्ये होती सामील

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिंधिया यांनी राजीनाम्यात लिहिले - मी काँग्रेसमध्ये काम करू शकणार नाही
  • सिंधिया आणि पंतप्रधान मोदी यांच्या तब्बल 50 मिनिटे झाली चर्चा

नवी दिल्ली/भोपाळ - सुमारे 22 तासांच्या हो-नाही, हो-नाही नंतर अखेर ज्योतिरादित्य सिंधिया यांचा राजीनामा आला. रंगपंचमीच्या दिवशी दुपारी 12.10 वाजता सिंधिया यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यावरून राजीनामा देण्याचे पत्र ट्विट केले. मात्र हा राजीनामा 9 मार्च रोजी लिहिला होता. त्यानंतर अवघ्या 20 मिनिटांनंतर काँग्रेसने सिंधिया यांना पक्षातून काढून टाकण्याचे आदेश जारी केले. याच्या 5 मिनिटानंतर 12.35 वाजता सिंधिया समर्थक 14 आमदारांनी आपला राजीनामा विधानसभेला ईमेल केला. हे सर्व आमदार सोमवारपासून बंगळुरुत थांबले आहेत. आणखी काही आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे. यातच आता सूत्रांकडून मिळालेल्या नवीन माहितीनुसार, येत्या 11 ते 13 मार्चदरम्यान सिंधिया भाजपमध्ये सामील होऊ शकता. भाजप त्यांना राज्यसभेचे तिकीट देऊन केंद्रात मंत्रीपद देण्याच्या तयारीत आहे.

राजीनाम्यात लिहिले - मी काँग्रेसमध्ये काम करू शकणार नाही


सिंधिया यांनी राजीनाम्यात लिहिले की,


"डिअर मिसेज गांधी, मी गेल्या 18 वर्षांपासून काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्य आहे. आता मी नव्याने सुरुवात करून पुढे जाण्याची वेळ आली आहे. मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. तुम्हाला माहिती आहेच, मागच्या वर्षीच हा मार्ग सुरू झाला. तथापि, माझे जनसेवेचे उद्दीष्ट पूर्वीपासून नेहमीसारखेच राहिले आहे, मी माझे राज्य आणि देशातील लोकांची त्याचप्रकारे सेवा करत राहीन. मला वाटते की हे काम या पक्षात (काँग्रेस) राहून यापुढे करू शकणार नाही. माझ्या लोकांबद्दल आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी, मला वाटतं की मी पुढे जाऊन एक नवीन सुरुवात केली पाहिजे. मला देशसेवेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि तुमच्या माध्यमातून माझे काँग्रेस पक्षातील सहकार्यांचे आभार.


शुभेच्छा.


आपला ज्योतिरादित्य सिंधिया।’’
 

कमलनाथ सरकार अल्पमतात


14 आमदारांनी राजीनामा पाठवल्यानंतर कमलनाथ सरकार संकटात सापडले आहे. राजीनामा मान्य केल्यास विधानसभेच्या सभापतींसह काँग्रेसचे केवळ 100 आमदार असतील. सध्या कमलनाथ सरकारकडे 4 अपक्षांसह सपाच्या 1 आणि बसपाच्या 2 आमदारांचे समर्थन आहे. अशात कमलनाथ यांच्याकडे 107 आमदारांचे समर्थन असेल. दरम्यान भाजपकडे सुद्धा 107 आमदार आहेत. 16 मार्चपासून सुरू होणार्‍या विधानसभा अधिवेशनात भाजपने अविश्वास ठराव आणला तर कमलनाथ यांना सरकार वाचवणे कठीण होईल.

काँग्रेस सिंधियांवर करू शकते कारवाई 


या दरम्यान सोनिया गांधी यांनी दिल्लीत आपल्या निवासस्थानी आपत्कालीन बैठक बोलावली. यामध्ये पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते दाखल झाले. सुत्रांनुसार, काँग्रेस सिंधिया यांच्यावर कारवाई करू शकते. दुसरीकडे सिंधियांनी मोदींची भेट घेतल्याच्या बातम्यानंतर भोपाळमध्ये मुख्यमंत्री निवासस्थानावरील वातावरण ढवळून निघाले आहे. बाला बच्चन, हुकुम सिंह कराडा, सज्जन सिंह वर्मा यांच्यासह अनेक मंत्री भेटण्यासाठी तेथे दाखल झाले. बदलत्या घटनाक्रमादरम्यान भाजप मुख्यालयात बैठक सुरू आहे. या बैठकीत शिवराज सिंह चौहान, पक्षाध्यक्ष व्ही.डी वर्मा आणि विनय सहस्त्रबुद्धे सहभागी आहेत.
 

सिंधिया यांचे पक्षात स्वागत - नरोत्तम


काँग्रेस नेते आण मंत्री पी.सी शर्मा म्हटले की, पक्षाच्या नेत्यांसोबत आमचे बोलणे सुरू आहे. आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. सरकार स्थिर असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. 
तर भाजप नेता नरोत्तम मिश्रा म्हणाले की, आम्ही ज्योतिरादित्य सिंधियांचे पक्षात स्वागत करतो. ते जमिनीशी जोडलेले नेते आहेत. या दरम्यान शेरोशायरी करत ते म्हणाले की, दुश्मनों के तीर खाकर दोस्तों के शहर में, उनको किस-किस ने मारा, ये कहानी फिर कभी।
 

भाजपकडे आहे हे पर्याय  


1. आपण काँग्रेससोबत नाहीत सिंधिया यांनी जाहीर करावे.  मंगळवारी राज्यसभा निवडणुकीसाठी संसदीय समितीची बैठक असून त्यामध्ये सिंधिया यांना तिकिट निश्चितीवर निर्णय होऊ शकतो. 

2. भाजप अगोदर सभागृहाची बैठक बोलावून सभापतींविरोधात अविश्वास ठराव घेऊन यावा. मात्र ही प्रक्रिया मोठी आहे, तसेच ती भाजपसाठी कठीण असेल. कमलनाथ यांनी देखील विश्वास प्रस्ताव घेऊन यावा. यावेळी भाजप त्यांना मतदाना हरवावे जेणेकरून सरकार कोसळेल,

अशी असू शकते काँग्रेसची रणनिती 


1. काँग्रेस आमदारांच्या बैठकीसाठी एक व्हिप जारी करावा. याचे उल्लंघन करणाऱ्याला सभागृहात प्रवेश नाकारावा. यामध्ये विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्वपूर्ण असेल. 
2. काँग्रेस राज्यसभा निवडणुकीपर्यंत प्रतिक्षा करू शकते. मात्र यासाठी 16 दिवस बाकी आहेत. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरूवातीला सरकार निर्णय घेऊ शकते. मोठ्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्यास, सिंधिया यांना राज्यसभेचे तिकीट आणि तुलसीराम सिलावट यांना प्रदेशाध्यक्ष निवडावे. 

बातम्या आणखी आहेत...