आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Madhypradesh Shivpuri In Sultan Garh Water Fall 11 Youth Drowned News And Update

मध्‍य प्रदेश: शिवपुरीमधील सुल्‍तानगड धबधब्‍यात 13 लोक वाहून गेले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - मध्‍य प्रदेशातील शिवपुरी जिल्‍ह्यातील सुल्‍तानगढ धबधब्‍यात 13 लोक वाहून गेले आहेत. जवळपास 34 लोक अजूनही येथे अडकल्‍याची माहिती आहे. स्‍वातंत्र्य दिनाच्‍या निमित्‍ताने पिकनिकसाठी हे लोक येथे आले होते. पोलिस आणि प्रशासनातर्फे रेस्‍क्‍यू ऑपरेशन सुरू करण्‍यात आले आहे. हेलिकॉप्‍टरच्‍या मदतीने लोकांना रेस्‍क्‍यू केले जात आहे.

 

मुख्‍यमंत्री शिवराज सिंह यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की, 7 लोकांना वाचवण्‍यात आले आहे. घटनेनंतर केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर घटनास्‍थळी पोहोचले आहेत. त्‍यांनी सांगितले की, धबधब्‍याच्‍या पाण्‍याचा प्रवाह प्रचंड वेगवान आहे. आणि एका दगडावर 30 हून अधिक लोक अडकलेले आहेत. अंधार आणि पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनूसार, येथे 40 लोक धबधब्‍यावरील प्रवाहात मौजमजा करत होते. मात्र पावसामुळे अचानक प्रवाह वाढला. यावेळी काही लोक तेथून बाहेर येण्‍यात कसेबसे यशस्‍वी झाले. उर्वरित मात्र एका दगडावर अडकलेले आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...