आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निराळे विचार, अनाेख्या कार्यशैलीचा नेता माेदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांद्रयान-२ माेहीम अखेरच्या क्षणी अयशस्वी ठरल्यानंतर इस्राेचे प्रमुख के. सिवन यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या खांद्यावर डाेके टेकवून अश्रूंचा बांध माेकळा केला. त्या क्षणी माेदींवरील त्यांचा विश्वास आणि एवढ्या प्रदीर्घकाळच्या मेहनतीनंतरही अंतिम यश न मिळाल्याचे दु:ख एकाच वेळी प्रकट झाले. तेव्हा पंतप्रधानांनी त्यांचे सांत्वन केले आणि नवा विश्वास जागवला हा त्यांच्या सहृदयतेची साक्ष देणारा प्रसंग हाेता. दुसऱ्या दिवशी इस्राेच्या संशाेधकांना त्यांनी ज्या पद्धतीने संबाेधित केले ते महत्त्वपूर्ण आहे. माेदी म्हणाले,‘तुम्ही असे लाेक आहात, जे माता भारतीसाठी, तिच्या विजयासाठी जगत आहात. माता भारतीसाठी तुम्ही संघर्षरत आहात. भारतमातेचे शिर उन्नत व्हावे यासाठी सारे आयुष्य पणाला लावत असता. आज भलेही काही तांत्रिक अडचणी आल्या असतील, परंतु यामुळे आमचा दृढनिश्चय कमी झालेला नाही, उलट ताे मजबूत झाला आहे.’ माेदींच्या नेतृत्वगुणातील ही एक अद्भुत बाब आहे. मी त्यांची अनेक भाषणे एेकली, परंतु हे भाषण सर्वात अनाेखे आणि अप्रतिम ठरले. प्रामाणिकता, विश्वसनीयता आणि देशाविषयीची कटिबद्धता या माेदींच्या गुणांवर लाेकांचा विश्वास आहे. मुख्यत: २००९ ते २०१४ या काळात जाे भ्रष्टाचार माजला, निर्नायक स्थिती निर्माण झाली हाेती, नीतिमत्ता पांगळी बनली आणि खंबीर नेतृत्वाचा अभाव जाणवत हाेता, या पार्श्वभूमीवर एक कणखर, दूरदृष्टी असणारा, देश व जनतेचा विचार करणारा नेता हवा हाेता. गाेव्यात त्यांना प्रचारप्रमुख आणि पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केल्यानंतर नऊ महिन्यांत देशभरातील जनतेने त्यांच्यावर विश्वास प्रकट केला. राजस्थानात निवडणूक प्रचारादरम्यान शेतमजूर आणि शेतकऱ्यांसाेबत मी भाेजन करीत हाेताे. त्या वेळी गप्पा करीत असताना हे लाेक म्हणाले, आम्ही माेदींना मत देणार, कारण ते गरिबीतून आले आणि गरिबांविषयी विचार करतात. एक तरुण म्हणाला, त्यांचे न घरदार आहे, सतत देशासाठी काम करतात, देशाचा सन्मान वाढवतात. आम्हाला असाच प्रामाणिक पंतप्रधान हवा. आणखी एक जण म्हणाला, आजवर पाकिस्तान भारतीय जवानांना पकडल्यानंतर शिरच्छेद करून पाठवत हाेता, परंतु हा पहिलाच शूर पंतप्रधान आहे, ज्याने २४ तासांत आमच्या वैमानिकास पाकिस्तानातून सुखरूप परत आणले. पंतप्रधान माेदी नेहमीच निराळ्या पद्धतीने विचार करतात आणि वेगळ्या शैलीने ताे विचार मांडतात. हेच वेगळेपण त्यांचे नेतृत्व अधिक मजबूत करते. सत्तेत आल्यानंतर त्यांना प्रत्येक मंत्री आणि त्यांच्या सचिवास बाेलावून १० स्लाइडचे सादरीकरण करण्यास सांगितले. येत्या पाच वर्षात काय करणार, काेणत्या संधी आणि आव्हाने आहेत हा विषय दिला हाेता. या सादरीकरणानंतर ते मंत्र्यांशी चर्चा करीत ती दीड-दाेन तास चालत असे. सर्व मंत्र्यांना सुशासनाची संपूर्ण कल्पना दिली. माेदींनी अनेक कार्यक्रम, याेजनांची अंमलबजावणी केली, यापैकी ‘प्रगती’ या कार्यक्रमाचा फारसा गाजावाजा झाला नाही. याअंतर्गत रेल्वे, जहाजबांधणी, रस्ते, विमानतळ किंवा धरणे यांच्याशी संबंधित २०-२५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांविषयी स्वत: माेदी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी, मुख्य सचिवांशी दर महिन्याला व्हिडिआे काॅन्फरन्स करतात. प्रत्येक वेळी ते १५ प्रकल्पांवर भूमिका मांडतात. पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात १५ लाख काेटींचे स्थगित प्रकल्प मार्गी लागले. अर्धवट राहिलेल्या ९० धरणांचे काम त्यांनी सुरू केले. हा माेदींच्या नेतृत्वाचा वेगळा पैलू आहे आणि दूरदृष्टीची साक्ष यातून पटते. पंतप्रधान माेदींच्या या विशिष्ट पद्धती आणि शैलीमुळे त्यांच्या नेतृत्वाची जगाला भुरळ पडली आहे. ते कितीतरी वेळ काम करतात, परंतु थकत नाहीत हे मी पाहिले आहे. नवरात्रीच्या उपवासाच्या काळात अमेरिकेत त्यांनी पाच दिवसांत म्हणजे १०० तासांत ५० कार्यक्रम केले, भारतात परत येताच दाेन तासांत बैठक घेणे हे माेदीच करू शकतात. त्यांचे प्रेरणादायी नेतृत्व, महान विचार, देशाप्रति कटिबद्धता आणि भ्रष्टाचाराविराेधात निर्भयपणे केलेली कारवाई यामुळे जनतेला असे वाटू लागले की, अनेक वर्षांपासून ज्या रूपाच्या नेत्याचे स्वप्न पाहत हाेताे ताे माेदींच्या रूपाने मिळाला. त्यांच्या नेतृत्वाखाली देश यशाेपथावर बराच पुढे जाईल. जनतेला अशाच नेत्याची प्रतीक्षा हाेती. पंतप्रधान माेदींना ६९ व्या जन्मदिनी तमाम भारतीयांच्या वतीने खूप-खूप शुभेच्छा!