आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Madrasas Do Not Breed People Like Nathuram Godse And Sadhvi Pragya Thakur, Says Azam Khan

मदरशांमध्ये काही प्रज्ञा साध्वी आणि गोडसेसारखे लोक घडवले जात नाहीत; केंद्र सरकारच्या मदरसा योजनेवर आजम खान यांचे विधान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामपूर - केंद्र सरकारकडून देशभरातील मदरशांमध्ये शैक्षणिक यंत्रणा बदलण्याच्या प्रस्तावाला समाजवादी पक्षाचे खासदार आजम खान यांनी तीव्र विरोध केला. एवढेच नव्हे, तर मदरशांमध्ये संगणक आणि गणित शिकवण्याचे धोरण चुकीचे आहे. मदरशांची संसस्कृती काही साध्वी प्रज्ञा किंवा नथुराम गोडसे घडवत नाही असे वादग्रस्त विधान आजम खान यांनी केले आहे. मदरशांमध्ये मुलांना धार्मिक शिक्षण दिले जाते. यासोबतच त्यांना इंग्रजी हिंदी आणि गणित आधीच शिकवले जातात. सरकारला मदरशांची मदत करायचीच असेल तर त्यांनी मदरशांसाठी इमारती उभारून, त्यांना फर्निचर आणि इतर सुविधा देण्यात याव्यात.


काय आहे सरकारचे धोरण
पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारने येत्या 5 वर्षांत अल्पसंख्याक समुदायाच्या 5 कोटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार असल्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 50 टक्के मुलींचा समावेश राहील. अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संगणक आणि गणित असे विषय शिकवले जातील. पुढील महिन्यात हा कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. केंद्र आणि राज्यांच्या प्रशासकीय सेवा, बँकिंग, एसआरसी, रेल्वे आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अल्पसंख्याक मुला-मुलींना मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे. ही सुविधा मुस्लिम, ख्रिस्ती, शीख, जैन, बौद्ध आणि पारशी समुदायातील आर्थिक मागास विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...