आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीव्ही डेस्क : हिना खान 72 व्या कान्स फिल्म फेस्टिवल 2019 च्या रेड कार्पेटवर चालणारी पहिली भारतीय टीव्ही अभिनेत्री बनली आहे. पण दुसरीकडे एका मॅगझिन एडिटरने हिनाची खिल्ली उडवली आहे. तिच्या कान्स लुकवर निशाणा साधत एडिटरने लिहिले, 'कान्स चांदीवली स्टूडियो बनला आहे का ? एडिटरच्या या टिप्पणीनंतर हिनाच्या समर्थनार्थ तिच्या फॅन्ससोबतच तिच्यासोबत काम करणारे कलाकारदेखील आले आहेत आणि सर्वांनी मिळून एडिटरला खडे बोल सुनावले. त्यानंतर एडिटरने माफी मागत पोस्ट डिलीट करून टाकली.
अनेक टीव्ही शोज आणि चित्रपटांचा साक्षीदार आहे चांदीवली...
चांदीवली स्टूडियोमध्ये फिल्म आणि टीव्ही सीरियल्सचे शूटिंग केले जाते. याठिकाणी विशेषतः डेली सोप्स शूट केले जातात. या स्टूडियोमध्ये शाहरुख खान, नसीरुद्दीन शाह, अनुपम खेर अशा स्टार्सने शूटिंग केली आहे.
टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे हिना...
हिना खानबद्दल सांगायचे तर ती टीव्हीचा प्रसिद्ध शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' ची लीड अभिनेत्री होती. या शोमधून ती 7 वर्षे काम करत राहिली. हा शो नेहमीच टीआरपीवर नंबर वनवर राहिली आहे. याव्यतिरिक्त ती 'बिग बॉस 11', 'खतरों के खिलाड़ी 5' आणि 'कसौटी जिंदगी के 2' चाही भाग बनली होती. ती टीव्हीच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींनपैकी एक आहे. सध्यातरी आपल्या फिल्मी करियरवर लक्ष देत आहे आणि आपली डेब्यू फिल्म 'लाइन्स' च्या स्क्रीनिंगसाठी कान्समध्ये पोहोचली आहे.
या लोकांनी केला हिनाला सपोर्ट...
- अर्जुन बिजलानी
'नागिन 2' फेम टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीने हिना खानच्या समर्थनार्थ एक लांबच लांब पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिले, "सर्वात आधी तर आम्हाला सर्वांनाच गर्व आहे की, हिना कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये गेली आहे. ती स्वतःच्या मेहनतीने तेथे पोहोचली आहे आणि हो, हिना खूप सुंदर दिसत आहे. अशा अपमानास्पद टिप्पणीवर सर्वात आधी मी सांगू इच्छितो की, तुम्ही मॅगझिनच्या एडिटर आहात या नात्याने अशा प्रकारची टिप्पणी करणे तुम्हाला शोभत नाही. कोणत्याही महिलेबद्दल असे काही बोलण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही आणि हो, तुमच्या या कमेंटने हिनाला एक सुपरस्टार बनवले त्यासाठी धन्यवाद.
- करणवीर बोहरा
करणवीर बोहराने आपल्या इंस्टाग्रामवर लिहिले, 'मला वाटते काही लोक आपल्या मुळांनाच विसरले आहेत. हा तोच चांदीवली स्टूडियो आहे, जेथे नसीरूद्दीन शाह, अनुपम खेर, सुशांत सिंह राजपूत यांसारख्या अनेक लोकांनी आपल्या करियरची सुरुवात केली होती आणि नाव कमावले. आम्हाला सर्वांनाच हिनावर खूप गर्व आहे आणि आम्ही सर्व तिच्यासोबत आहोत. जर तुम्ही काही चांगले करू शकत नाही तर कृपया अशा प्रकारचे वाईट टिप्पणी करू नये.'
- एकता कपूर
हिना खानची जवळची मैत्रीण आणि प्रोड्यूसर एकता कपूरनेदेखील करणवीर बोहराच्या पोस्टवर कमेंट करून लिहिले, 'मला जितेश आवडतात पण त्यांची ही पोस्ट भयानक आहे.'
- नकुल मेहता
'इश्कबाज' फेम नकुल मेहतानेदेखील ट्विटरवर हिना खानचे समर्थन केले. त्याने लिहिले, 'कान्स कधीच चांदीवली स्टूडियो बनू शकत नाही. हे कधीच नाही होऊ शकत. चांदीवली ती जागा आहे जेथे अनेक टीव्ही शो, जाहिरात फिल्म शूट केल्या गेल्या आहेत. काही आयकॉनिक गोष्टीही बनल्या आहेत. हिनाचा आम्हाला अभिमान आहे.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.