आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेब्रुवारीच्या खास तिथी, माघ मासातील पौर्णिमा आणि महादेवाच्या पूजेचा उत्सव महाशिवरात्री

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

वर्ष 2020 मधील दुसरा महिना फेब्रुवारीमध्ये माघ पौर्णिमा आणि महाशिवरात्री सहित इतर खास तिथी आल्या आहेत. पंचांगानुसार फेब्रुवारी महिन्यात माघ मास समाप्त होऊन फाल्गुन मास सुरु होईल. येथे जाणून घ्या, फेब्रुवारी महिन्यातील कोणत्या तिथीला काय करावे....

  • शनिवार, 1 फेब्रुवारीला नर्मदा नदी जन्मोत्सव साजरा केला जाईल. या तिथीला नर्मदा नदीची विशेष पूजा केली जाते.
  • बुधवार, 5 फेब्रुवारीला जया एकादशी आहे. याला भीष्म एकादशी असेही म्हणतात. या तेथील भगवान विष्णूंसाठी व्रत उपवास करावा आणि सूर्यास्तानंतर तुळशीची पूजा करावी.
  • रविवार, 9 फेब्रुवारीला माघ मासातील पौर्णिमा तिथी आहे. या दिवशी संत रविदास यांची जयंतीसुद्धा आहे.
  • बुधवार, 12 फेब्रुवारीला संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी श्रीगणेशाची विशेष पूजा करून उपवास ठेवावा.
  • बुधवार, 19 फेब्रुवारीला विजया एकादशी आहे. एकादशीला भगवान विष्णूंसाठी व्रत करण्याचे विधान आहे. श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मीचे विशेष पूजन करावे.
  • शुक्रवार, 21 फेब्रुवारीला महादेवाच्या पूजेचे महापर्व शिवरात्री आहे. या दिवशी महादेवाला अभिषेक करावा. शिवलिंगावर तांब्याच्या कलशातून जल अर्पण करावे. चांदीच्या कलशातून दूध अर्पण करावे.
  • रविवार, 23 फेब्रुवारीला माघ अमावस्या आहे. या दिवशी पितरांसाठी श्राद्ध आणि तर्पण करावे. अमावस्या तिथीला पवित्र नदीमध्ये स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे.
  • गुरुवार, 27 फेब्रुवारीला विनायक चतुर्थी आहे. ही तिथी श्रीगणेशाला समर्पित आहे. या तिथीला श्रीगणेशाची विशेष पूजा करावी.
बातम्या आणखी आहेत...