आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये महिलांची घोडेस्वारी स्पर्धा; ११ महिलांमध्ये रंगते शर्यत, यातील सहभागींमध्ये कोणी टीव्ही अँकर, तर अभियांत्रिकीचे विद्यार्थी; नसतात व्यावसायिक जॉकी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ससेक्स - ब्रिटनमध्ये या गुरुवारी म्हणजे एक ऑगस्टपासून मॅग्नोलिया कप घोडेस्वारी स्पर्धेला सुरुवात होत आहे. ही शर्यत प्रत्येक वर्षी एक ऑगस्ट रोजी होते. याची सुरुवात २०१२ मध्ये झाली. म्हणजे यंदाचे हे सातवे वर्ष आहे. विशेष म्हणजे या शर्यतीत केवळ महिला सहभागी होतात. या शर्यतीतून जमा झालेला निधी जगभरातील दुर्बल महिलांच्या विकासासाठी दान करतात. अशा प्रकारची ही एकमेव शर्यत आहे. 


जेव्हा पहिल्यांदा शर्यत झाली तेव्हा पाहण्यासाठी १० हजार लोकांची उपस्थिती होती. हळूहळू शर्यतीची लोकप्रियता वाढली आणि जवळपास ३० हजारपर्यंत लोक शर्यत पाहायला येण्याची शक्यता आहे. शर्यतीची लोकप्रियता, प्रभाव इतका वाढला की, महिलांच्या या शर्यतीला ब्रिटनमध्ये महिला दिवस असे नाव देण्यात आले. 


शर्यतीचे एक आणखी वैशिष्ट्य आहे - यात ज्या ११ महिला सहभागी होतात त्यातील एकही महिला व्यावसायिक जॉकी नाही. सहभागी होणाऱ्यामध्ये कोणी टीव्ही अँकर, कोणी पत्रकार, कोणी अभियांत्रिकीची विद्यार्थी आहेत. सर्व हौशीने घोडेस्वारी करतात. या शर्यतीला व्यावसायिक स्वरूप येऊ नये यासाठी व्यावसायिक महिला जॉकीला यात सहभागी केले जात नाही.  एका शर्यतीत अॅम्बेसेडरला सहभागी केले जाते, ज्यात व्यावसायिक जॉकी सहभागी होऊ शकतात किंवा नाही. यंदा जॉर्जियाची कोनोली शर्यतीची अॅम्बेसेडर आहे, जी  व्हिक्टोरिया रेसिंग क्लबची जुनी सदस्य आहे.

 

१. वॉग विलियम्स : टीव्ही अँकर, मॉडल
२. राेसी टॅपनर : विद्यार्थी, ऑक्सफर्ड-ब्रुक्स युनिव्हर्सिटी
३. सोफी वान डर मर्व : गृहिणी
४. किटी ट्राइस : पत्रकार, रेसिंग पोस्ट 
५. वालेरिया होलिंगर : मार्केटिंग 
६. रॅसेल गॉलँड : संवाद विभाग
७. ग्रोवर : आर्थिक सल्लागार
८. अॅलेक्सिस ग्रीन : पत्रकार, बीबीसी
९. लुइसा जिसमेन : आंत्रप्रेन्योर
१०. जॉर्जिया कोनोली : रेसिंग क्लब स्पर्धेची अॅम्बेसेडर  
११. खादिला मल्ला : अभियांत्रिकी विद्यार्थी

 

या वर्षी मॅग्नोलिया कप;  पहिल्यांदा जॉकीला हिजाब

खादिजा साऊथ लंडनची रहिवासी आहे. इस्लामला मानते. लंडन साऊथ बँक युनिव्हर्सिटीमधून अभियांत्रिकीचा अभ्यास करत आहे. १८ वर्षीय खादिजा जवळपास १० वर्षांची असताना घोडेस्वारी करायला शिकली.  माहिती मिळाली तेव्हा त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. खादिजा म्हणाली - “जेव्हा मी शर्यतीसाठी नाव दिले तेव्हापासून लाेक मला संदेश पाठवून, तू आमची प्रेरणा असल्याचे म्हटले. मी १८ वर्षांची आहे असा कधी विचारही केला नव्हता, कोणत्या व्यक्तीला मी प्रेरणा देऊ शकेल. जेव्हा मी हिजाब व चष्मा घालून घोडेस्वारी करते तेव्हा ट्रॅकवर उपस्थित लोक मला पोलिस समजतात. 

बातम्या आणखी आहेत...