औरंगाबाद - लोकशाहीमध्ये देशाचा चौथा स्तंभ म्हणून वृत्तपत्रांना ओळखले जाते. भारतात वृत्तपत्राचा जन्म झाला तो 1780 मध्ये जेम्स ऑगस्टस हिकी यांच्या ‘बेंगॉल गॅझेट’ या पत्राने. त्यानंतर मराठी वृत्तपत्र सुरू होण्यास तब्बल 48 वर्ष वाट पाहावी लागली. 6 जानेवारी 1832 या दिवशी ‘दर्पण’च्या रूपाने पहिले मराठी वृत्तपत्र सुरू झाले. बाळशास्त्री जांभेकर यांनी हे पत्र सुरू केले म्हणून जांभेकरांना मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हटले जाते. ‘दर्पण’ची सुरूवात आणि जांभेकरांचा काळ म्हणजे एक दैदिप्यमान कारकीर्दच होय. आज पत्रकार दिनानिमित्त जाणून घेऊया बाळशास्त्री जांभेकर यांच्या आयुष्यातील काही खास प्रसंग...
विसाव्या वर्षी सुरू केले वृत्तपत्र
- कोकणातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी 1812 मध्ये जांभेकरांचा जन्म झाला.
- वयाच्या विसाव्या वर्षी 1832 मध्ये त्यांनी ‘दर्पण’ या नावाने मराठी वृत्तपत्र सुरू केले.
- 4 मे 1832 पासून मराठी, इंग्रजी अशा दोन्ही भाषांत हे वृत्तपत्र प्रकाशित केले जाई.
जांभेकरांचा परिवार
गंगाधरशास्त्री व सगुणाबाई या दाम्पत्याला चार अपत्ये होती. त्यात नारायण, बाळकृष्ण, लाडूबाई व चिमाबाई यांचा समावेश होतो. माता सगुणाबाईचे निधन काशी येथे 1830 मध्ये झाले तर गंगाधर शास्त्रींचे निधन पोंभुर्ले येथे 1840 मध्ये झाले.
बाळशास्त्रींना म्हणत ‘बालबृहस्पती’
बाळशास्त्रींचे दोन विवाह झाले होते. त्यातील पहिली पत्नी व मुलाचे निधन झाल्याने त्यांनी दुसरा विवाह केला. बाळशास्त्री जन्मजात कुशाग्र बुद्धिमत्तेचे असल्याने त्यांचे प्रारंभिक शिक्षण घरीच झाले. मराठी व संस्कृतमध्ये निष्णांत झाल्याने बाळबोध, गीतपाठ, वेदपठण, अमरकोश, लघुकौमुदी व पंचमहाकाव्य या संस्कृत ग्रथांचा त्यांनी अभ्यास केल्याने त्यांना ‘बालबृहस्पती’ संबोधले जायचे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, बाळशास्त्री जांभेकर यांच्या कारकिर्दीतील काही खास प्रसंग...