आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री आणि सहा मंत्र्यांनी कोणाला वंदन करत आणि कोणाचा आशीर्वाद घेऊन घेतली शपथ, जाणून घ्या

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्रात झालेल्या राजकीय महानाट्यानंतर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यांसह काँग्रसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली. 

कोणी कोणाला वंदन करत, तसेच आशीर्वादाने आणि साक्षीने घेतली शपथ 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत आणि आईवडिलांचे स्मरण करत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने  छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शपथ घेतली. 
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे नाव घेत मंत्रीपदाची शपथ घेतली. तर छगन भुजबळ यांनी महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरेंना वंदन करत शरद पवारांच्या आदेशाने शपथ घेतली. यावेळी त्यांनी प्रत्येक शब्दावर जोर देत आवेशपूर्ण अशी शपथ घेतली. शपथेअखेर त्यांनी जय ज्योती जय क्रांतीचा नारा दिला. काँग्रसकडून बाळासाहेब थोरात यांनी सोनिया गांधीच्या आशीर्वादाने शपथ घेतली. तर शपथेअखेर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवरायचा नारा दिला. दुसरीकडे काँग्रेस नेते नितीन राऊत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करत सोनिया आणि राहुल गांधींच्या आशीर्वादाने व तथागत भगवान गौतम बुद्धांच्या साक्षीने मंत्रिपदाची शपथ घेतली.