आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या हक्काचे 15558.05 कोटी रुपये परत करा! मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्राच्या हक्काचे 15 हजार 558.05 कोटी रुपये परत करा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना पत्र पाठवले आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी केंद्र सरकारकडे थकित असलेल्या महाराष्ट्राच्या पैशांचा उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच, चुकीच्या कर पद्धतीमुळे राज्याचे मोठे नुकसान होत आहे असेही ठाकरेंनी ठणकावले आहे. तत्पूर्वी राज्यांना केंद्राकडून जीएसटीचे वितरण योग्यरित्या होत नाही असा आरोप करताना शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी राज्यसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने यासंदर्भातील माहिती ट्विट केली आहे. त्यानुसार, "मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना पत्र पाठवले आहे. या पत्रातून त्यांनी वस्तू आणि सेवा कर अर्थातच जीएसटीचा मोबदला आणि कर परतावा करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्र सरकारचे केंद्रावर एकूण 15 हजार 558 कोटी रुपये थकित आहेत. केंद्र सरकारकडून राज्य शासनाला येणारा कर परतावा कमी झाल्यामुळे राज्यातील विकास कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे ही रक्कम लवकरात लवकर मिळावी. जेणेकरून राज्यातील विकास कामांना वेग देता येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे." विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप युती तुटली. यानंतर केंद्रातही लोकसभेत 18 खासदार असलेल्या शिवसेनेने भाजपचा पाठिंबा काढला. महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापित करणाऱ्या शिवसेनेने भाजपविरोधात आक्रमक भूमिका मांडण्यास सुरुवात केली. उल्लेखनीय बाब म्हणजे, नागरिकत्व विधेयकावर लोकसभा आणि राज्यसभेत वेग-वेगळी भूमिका मांडली आहे. सुरुवातीला लोकसभेत शिवसेनेने या विधेयकाला पाठिंबा दिला. त्यानंतर सहकारी पक्ष काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींनी कथितरित्या नाराजी व्यक्त केल्यानंतर शिवसेनेने राज्यसभेत आपली भूमिका बदलली असे सांगितले जात आहे. त्यातच जीएसटी आणि करांच्या मुद्द्यांवर आता शिवसेनेने केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

बातम्या आणखी आहेत...