महा वादळ / गुजरातकडे सरकले, 54 वर्षांत प्रथमच 10 दिवसांच्या अंतराने 2 भीषण चक्रीवादळे अरबी समुद्रात

1965 नंतर प्रथमच 10 दिवसांच्या कालावधीत अरबी समुद्रात दोन चक्रीवादळ

Nov 06,2019 10:07:00 AM IST

अहमदाबाद | अरबी समुद्रात निर्माण झालेले महावादळ १२० किमी वेगाने गुजरातकडे जात आहे. हवामान खात्यानुसार, १९६५ नंतर प्रथमच १० दिवसांच्या कालावधीत अरबी समुद्रात दोन चक्रीवादळ निर्माण झाले आहे. याआधी क्यार वादळ होते. महावादळ बुधवार, गुरुवारी पोरबंदर ते दीव दरम्यानच्या समुद्र किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.


- आपत्तीला सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफचे १५ पथके तसेच पश्चिमी नौदलही सतर्क आहे.

- १२६०० नौका समुद्रात गेल्या. त्यापैकी १२ हजार नौकांना परत बोलावले.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळाचा धोका लक्षात घेता मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव आणि मुख्य सल्लागार बैठकीस उपस्थित होते.

X