आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Maha Election; Chief Minister Misused Office, ED Should Conduct A Fair Inquiry Nana Patole

Maha Election; मुख्यमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग केला, 'ईडी' ने याबाबत निष्पक्ष चौकशी करावी- नाना पटोले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अ‌ॅक्सिस बँकेला फायदा पोहोचवून आपल्या पत्नीची पदोन्नती केली असल्याचे एका सामाजिक कार्यकर्त्याने सक्त वसुली संचालनालय (ईडी) कडे तक्रार केली आहे. त्या तक्रारीची 'ईडी' ने निःपक्ष चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अ‌ॅक्सिस बँकेत उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांना फायदा पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांची बँक खाती अ‌ॅक्सिस बँकेत वळती केल्याचा आरोप नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलापुरे यांनी केला आहे. ‌याबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, अ‌ॅक्सिस बँक ही खासगी बँक आहे. त्या बँकेला फायदा मिळवून दिल्यामुळे अमृता फडणवीस त्या बँकेच्या उपाध्यक्षा झाल्या आहेत. याविषयी सामाजिक कार्यकर्त्याने 'ईडी'कडे तक्रार केली आहे, त्या तक्रारीची ईडीने निःपक्ष चौकशी करावी.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते असून त्यांनी सर्व पोलिस विभागाचे खाते हे अ‌ॅक्सिस बँकेत वळवले. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस ज्या आधी अ‌ॅक्सिस बँकेत कर्मचारी म्हणून काम करत होत्या, त्या मात्र आता अ‌ॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा झाल्या आहेत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आहे. या आधारावर नागौरी येथील सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलापुरे यांनी ईडीकडे तक्रार केली आहे. त्यावर बोलताना नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली.

बातम्या आणखी आहेत...