आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Maha Election; 'If I Wanted A Minister, I Would Have Left The Party In The Last Election', Replied Shivinder Rajin To Jayant Patil's Remarks.

Maha Election; 'मला मंत्रीपद हवे असते तर, मागच्या निवडणुकीतच पक्ष सोडून गेलो असते', जयंत पाटलांच्या टीकेला शिवेंद्रराजेंचे उत्तर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- जयंत पाटलांनी केलेल्या टीकेला नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिवेंद्र राजेंनी चोख उत्तर दिले. "मागील 15-20 वर्षे मी राष्ट्रवादीत आमदार म्हणून काम केले, त्या काळात पक्षातील नेत्यांना माझी क्वचीतच माझी आठवण यायची. आता मी पक्षातून बाजूला गेल्यावर, त्यांनी माझ्या नावाचा जपच सुरू केलाय. मला मंत्रीपदाचा हव्यास असता तर, मागच्याच निवडणूकीत राष्ट्रवादी पक्ष सोडला असता. मी पक्षाशी कधीही दगाफटका केला नाही, लोकसभेलाही प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. आता माझी निवडणूक आहे, त्यामुळे मी पक्षातून बाजूला झालो आहे. याचा अर्थ मी पदासाठी बाहेर पडलो असा होत नाही आणि ते आमच्या रक्तात नाही. माझे घर हे शब्दाला जागणारे आहे. राष्ट्रवादीत होतो, तिथे प्रामाणिकपणे काम केले आता भाजपमध्ये आहे. इथेही प्रामाणिकपणेच काम करणार आहे", असे उत्तर शिवेंद्र राजेंनी दिले.
 
मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये गेले असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. त्याला अनुसरुण बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्टीकरण दिले. भाजपने राष्ट्रवादीतून आलेल्या सर्वांची निष्ठा पाहिल्याशिवाय मंत्रिमंडळ न देण्याचा फतवा काढला, तर शिवेंद्रराजे काय करतील? असा खोचक सवालही जयंत पाटलांनी विचारला.

बातम्या आणखी आहेत...