आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Maha Election; When Asked About Meeting Bhide Guruji, He Wanted To Leave Politics And Go Back With Friends.

Maha Election; 'राजकारण सोडून मित्रांसोबत फिरायला जावं वाटतयं', भिडे गुरुजींच्या भेटीबद्दल विचारल्यावर उदयनराजेंनी दिली ही मिश्किल प्रतिक्रीया

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतंच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांची भेट घेतली. उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेस या ठिकाणी ही भेट झाली. उदयनराजेंना या भेटीचे कारण विचारले असता, ही एक कौटुंबिक भेट असल्याची त्यांनी सांगितले. यावेळी त्यांना ही बैठक राजकीय दिशा ठरवण्यासाठी होती का? असे विचारल्यावर त्यांनी मिश्कील उत्तर दिले. ते म्हणाले,"राजकारण सोडून आता मित्रांसोबत फिरण्याचा विचार करतोय. मला तर आता असं वाटतंय की राजकारणातूनच अलिप्त व्हावं", अशी प्रतिक्रीया यावेळी उदयनराजेंनी दिली. एकीकडे उदयनराजेंचा भाजप प्रवेश निश्चित मानला जातोय, दर दुसरीकडे त्यांनी असे वक्तव्य केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता राजेंची पुढील दिशा काय असणार, हे त्यांनाच ठाऊक. पण त्यांच्या या प्रतिक्रीयेमुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोचली आहे.
 
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेपासून दूर राहिलेले खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाला असून दिल्लीतच राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असल्याचे बोलले जात आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...