आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई / नवी दिल्ली - शिवसेनेला पाठिंबा द्यावी की नाही या मुद्द्यावर काँग्रेसची सर्वोच्च कार्य समितीची बैठक सोमवारी घेण्यात आली. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील यावर चर्चा केली. या बैठकीमध्ये कुठल्याही नेत्याने पक्षाची भूमिका मीडियामध्ये मांडू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. काँग्रेसच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, की स्थानिक नेत्यांसोबत पुन्हा बैठक होणार आहे. संध्याकाळी 4 वाजता होणाऱ्या या बैठकीनंतर निर्णय घेतला जाईल असेही ते पुढे म्हणाले.
काँग्रेसच्या निर्णयानंतरच राष्ट्रवादी भूमिका मांडणार -नवाब मलिक
राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये बोलताना, "काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक काय निर्णय घेते यावर राष्ट्रवादीचे लक्ष होते. परंतु, काँग्रेसने पुन्हा 4 वाजता बैठक घेण्याचे ठरवले आहे. काँग्रेसच्या निर्णयाची आम्ही वाट पाहत आहोत. त्यांनी निर्णय घेतल्यानंतरच राष्ट्रवादी निर्णय घेणार आहे. आम्ही काँग्रेससोबत एकत्रित निवडणूक लढवली होती. त्यामुळे, शिवसेनेला समर्थन देण्यावर निर्णय देखील मिळूनच घेणार आहोत." असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. संध्याकाळी 4.30 वाजता राष्ट्रवादीची आणखी एक बैठक होणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादी सुद्धा आपली भूमिका मांडणार आहे.
तत्पूर्वी शिवसेनेचे केंद्रातील मंत्री अरविंद सावंत यांनी सोमवारी सकाळीच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सरकारबाहेर पडले. आता राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा करावी असे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले आहेत. सोबत, पाठिंबा देताना आघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर देखील एकमत होणे आवश्यक आहे. सोबतच शिवसेनेला पाठिंबा बाहेरून द्यावा की सरकारमध्ये सहभागी होऊन यावर देखील निर्णय घेतला जाणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.