आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहमंत्र्यांनी भीमा कोरेगाव घटनेचा अहवाल मागवला, मिलींद एकबोटे आणि संभाजी भिडेंचे प्रकरणात नाव आले होते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'शहरी नक्षलवादी शब्द चुकीचा वापरणे चुकीचे आहे'

पुणे- कोरेगाव भीमा प्रकरणाचा आणि तेथील सद्यस्थितीच्या सविस्तर अहवालाची मागणी राज्याचे गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी बुधवारी केली. भाजपा सरकारचा उल्लेख करत नागरिकांना वेगळ्या विचारधारेसाठी "शहरी नक्षलवादी" ठरवणे चुकीचे असल्येचही देशमुखे म्हणाले.विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोरेगाव भीमा प्रकरणात पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईची चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी केली होती. माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाले की, कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या सद्यस्थितीबद्दल आणि त्यावेळेस झालेल्या तपासाचा अहवाल मी मागवला आहे.

31 डिसेंबर 2017 ला एल्गार परिषद कॉन्क्लेव्ह झाली होती. त्यानंतर 1 जानेवारील कोरेगाव भीमामध्ये मोठा गोंधळ झाला. त्या दोन्ही घटनांच काही संबंध लागतो का, याचा तपास करत असताना पुणे पोलिसांकडून 'अर्बन नक्षल' शब्द वापरण्यात आला होता. पुणे पोलिसांकडून खटला दाखल करुन काही कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले होते. यात मिलींद एकबोटे आणि संभाजी भिडे यांचा हात असल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी मिलींद एकबोटेला ताब्यात घेतले होते, पण नंतर जामिनावर त्याची सुटका झाली. 
 

बातम्या आणखी आहेत...