आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HSC Results: बारावीचे निकाल जाहीर, कोकण विभागाने बाजी मारली, तर राज्यातील सरासरी निकाल 85 टक्के

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - महाराष्ट्रात 12 वीचा निकाल जाहीर झाला आहे. यात नेहमीप्रमाणेच मुलींनी बाजी मारली. राज्यातील एकूणच निकालाची टक्केवारी 85 टक्के आहे. त्यामध्ये मुलींचा सरासरी आकडा 90.25 टक्के आणि मुलांचा आकडा 82.40 टक्के आहे. विभागानिहाय आकडेवारी पाहिल्यास कोकण यात अव्वल स्थानी आहे. तर नागपूरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. विशेष म्हणजे, राज्यातील जवळपास 4500 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना 90 टक्क्यांपेक्षा अधिक मार्क मिळाले आहेत.

 

विभागनिहाय असा आहे निकाल
- औरंगाबाद 87.29%
- नाशिक 84.77%
- लातूर 86.08%
- अमरावती 87.55%
- मुंबई 83.85%
- पुणे 87.88%
- नागपूर 82.51%
- कोल्हापूर 87.1%
- कोकण 93.23%