आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आम्ही तिघे एकत्र राहू आहोत आणि एकत्रच राहणार, कोणतेही संकट आले तरी त्याला सामोरे जाणार' -शरद पवार 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रामाणिक आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत, गेले तरी पक्षांतरबंदी कायदा आहेच!
  • राजकीय घडामोडींवर उद्धव ठाकरे आणि शरद पवारा यांची संयुक्त पत्रकार परिषद
  • आम्हाला राजभवनावर नेले, पण का नेले याची कल्पना नव्हती -राष्ट्रवादी आमदार

मुंबई - महाराष्ट्रात अजित पवारांच्या पाठिंब्याने झालेल्या भाजप सरकार स्थापनेवर मलाही आश्चर्य झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रामाणिक आमदार या सरकारमध्ये जाणार नाहीत. तरीही ते भाजपमध्ये जात असतील तर देशात पक्षांतरबंदी कायदा आहेच असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. पक्षांतरबंदी अंतर्गत त्याची सदस्यता जाणार याची शक्यता नाकारता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या विरोधात आहे. तरीही त्यास झुगारून आमचे काही आमदार भाजपला पाठिंबा देत असतील तर आम्ही काय, त्यांना जनता देखील माफ करणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे, अजित पवारांसोबत जे आमदार राजभवनावर गेले त्यांना देखील आपण काय करतोय याची कल्पना नव्हती असा दावा शरद पवार यांनी केला आहे.

आम्हाला राजभवनावर नेले, पण का नेले याची कल्पना नव्हती -राष्ट्रवादी आमदार

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे काही आमदार देखील आणले आणि त्यांना बोलण्याची संधी दिली. यामध्ये एकानंतर एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांनी सकाळी झालेल्या घटनाक्रमाची माहिती दिली. आम्हाला सर्वांना राजभवनावर शनिवारी सकाळी नेण्यात आले. का नेले जात आहे याची काहीच माहिती दिली नाही. यानंतर शपथविधी झाला तेव्हा संपूर्ण प्रकार लक्षात आला असा दावा या आमदारांनी केला आहे. यामध्ये संदीप क्षीरसागर, राजेंद्र शिंगणे यांचा समावेश होता.

आम्ही आमदारांच्या सह्या घेऊन ठेवल्या होत्या, राज्यपालांचीही फसवणूक झाली

शरद पवार पुढे म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 आमदारांची यादी आम्ही तयार करून त्यावर स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. अजित पवारांनी तीच यादी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना दाखवली. प्रत्यक्षात, त्यांनी राज्यपालांची देखील फसवणूक केली असा आरोप शरद पवारांनी केला.

कुठल्याही संकटात एकत्रच राहू, उद्धव ठाकरेंसह पवारांचे आश्वासन

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्रित येऊन सरकार स्थापनेचा निर्णय घेतला होता. यासाठी शनिवारी अंतिम बैठक देखील होणार होती. परंतु, ऐनवेळी शनिवारी सकाळीच मुख्यमंत्री आणि उप-मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुठल्याही परिस्थितीत एकत्रच राहतील. असे संयुक्तरित्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे.

अजित पवारांवर कारवाईचा निर्णय पक्षाच्या बैठकीत 


राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबाला दगा देऊन भाजपसोबत सरकार स्थापित करणारे अजित पवार यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात येईल. ही कारवाई कोणत्या स्वरुपाची आणि कशी राहील यासंदर्भात पक्षाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना सरकारमध्ये अडीच वर्षांचे मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे यांना दिले जाणार अशी चर्चा होती. त्यावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना, सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नव्हत्या असे स्पष्टोक्ती पवारांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...