Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Mahaarati in the temple of Shiva Parvati

अकलूजच्या शिवपार्वती मंदिरात महाआरतीने उजळले आसमंत

प्रतिनिधी | Update - Sep 04, 2018, 11:32 AM IST

हजारो सुवासिनींच्या महाआरतीने अकलूज येथील शिवपार्वती मंदिरात भक्तीचे जणू भरतेच आले होते. श्रावन मासातील शेवटच्या सोमवार

  • Mahaarati in the temple of Shiva Parvati

    अकलूज- हजारो सुवासिनींच्या महाआरतीने अकलूज येथील शिवपार्वती मंदिरात भक्तीचे जणू भरतेच आले होते. श्रावन मासातील शेवटच्या सोमवारनिमित्त आयोजित केलेल्या या महाआरतीने मंदिर व परिसरातील आसमंत उजळून निघाला होता.


    शंकरनगर (अकलूज) येथील शिवपार्वती मंदिरात श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारनिमित्त दिवसभर भरगच्च धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. सायंकाळी सात वाजता झालेली महाआरती शिवभक्तीची चेतना जागृत करून गेली. पुणे येथील विख्यात गायिका आरती दीक्षित यांच्या मधुर आवाजात गायल्या गेलेल्या या महाआरतीला हजारो महिलांची साद होती. हाती तबक व निरंजन घेऊन आलेल्या सुहासिनी शिवपार्वतीच्या भक्तीत लीन झाल्या होत्या. सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महाआरती झाली. उपस्थित सर्व महिलांना प्रसाद म्हणून श्रीफळ व हळदी-कुंकू देण्यात आले. महाआरतीनंतर शोभेच्या दारूची केलेली आतषबाजीही डोळ्यात साठवण्याजोगी होती. येणाऱ्या सर्व भक्तांना खिचडीचा प्रसाद देण्यात येत होता. दुपारी आरती दीक्षित यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.

Trending