आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाबळेश्वर ठरले देशातील सर्वांत जलमय स्थान, तब्बल 7 हजार 631 मिमी पावसाची नोंद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- वर्षांनुवर्षे ईशान्य भारतामधील चेरापुंजी, आणि मॉसिनरॉम या सर्वाधिक पावसाची नोंद करण्याऱ्या ठिकाणांना मागे टाकत, महाराष्ट्रातील महाबळेश्वरने देशातील सर्वांत जलमय स्थान आणि सर्वाधिक पावसाचे ठिकाण, अशी ओळख यंदा प्राप्त केली आहे. एक जून ते सात सप्टेंबर 2019 या काळात महाबळेश्वरमध्ये 7 हजार 631 मिलीमीटर इतक्या प्रचंड (तीनशे इंचाहून अधिक) पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी महाबळेश्वरमध्ये 237 इंच पावसाची नोंद झाली होती. यंदा पावसाचे अद्याप किमान 22 दिवस शिल्लक असतानाच, महाबळेश्वरमध्ये पावसाने उच्चांक प्रस्थापित केला आहे. मुसळधार पाऊस अद्याप सुरुच असून, पावसाचा नवा विक्रम महाबळेश्वर प्रस्थापित करणार, याविषयी आता कोणतीही शंका नाही.


आजवर जगातील सर्वाधिक पावसाचे स्थान म्हणून मेघालयातील चेरापुंजी आणि मॉसिनरॉम यांची नावे आघाडीवर होती. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेरापुंजीत आजपर्यंत 6082 मिमी तर मॉसिनरॉम येथे 6218 मिनी पावसाची नोंद झाली आहे. ही आकडेवारी पाहता या दोन्ही चर्चित जलस्थानांपेक्षाही सुमारे 1 हजार मिलीमीटर अधिक पावसाची नोंद महाबळेश्वरला झाली आहे.

 

रविवी दुपारपर्यंत 306.2 इंच
महाबळेश्वर येथील भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या स्थानिक केंद्रातील वैज्ञानिक सहायक विशाल रामचंद्रन् यांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 सप्टेंबरला महाबळेश्वर येथे पावसाने 300 इंचाचा आकडा पार केला, असून रविवारी दुपारी 3 पर्यंत महाबळेश्वर येथील पावसाची एकूण आकडेवारी 306.2 इंच (7777.9 मिमी) इतकी झाली आहे. पाऊस अद्याप सुरूच असल्याने ही आकडेवारी वाढत जाणार, अशी चिन्हे आहेत.

 

ढग संशोधन केंद्राची माहिती
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रियॉलॉजी (आयआयटीएम) तर्फे ‘मान्सून मिशन’ अंतर्गत महाबळेश्वर येथे ‘हाय अल्टिट्यूड क्लाऊड फिजिक्स लॅबोरेटरी’ची स्थापना केली आहे. मान्सूनच्या अंदाजात अधिक नेमकेपणा यावा, ढगांची रचना, अंतर्भाग यांची शास्त्रीय माहिती समजून घेता यावी, हा या प्रयोगशाळेचा हेतू आहे. आशिया खंडातील अशा प्रकारची ही एकमेव प्रयोगशाळा आहे. ढगांच्या नेमक्या अभ्यासासाठी 1 हजार ते 1500 मीटर्स उंचीवरील ढग आदर्श समजले जातात. महाबळेश्वरची समुद्रसपाटीपासूनची उंची 1438 मीटर्स आहे. त्यामुळे हे स्थान अशा प्रकारच्या प्रयोगशाळेसाठी आदर्श आहे. उंचीवरील स्थान, घनदाट वनसंपदा या घटकांमुळे तसेच अरबी समुद्रावरून येणारे ढग प्रदूषणविरहित येथे पोचत असल्याने इथे ढगांचा अभ्यास संशोधनासाठी अधिक नेमकेपणाने शक्य होतो, अशी माहिती मिळाली. येथील प्रकल्पप्रमुख तसेच वरीष्ठ संशोधक बी. एन. गोस्वामी, डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

बातम्या आणखी आहेत...