आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरामध्ये सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी शास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. उज्जैनचे भागवत कथाकार पं. मनीष शर्मा यांच्यानुसार महाभारत काळात युधिष्ठीरने श्रीकृष्णाला विचारले की, घरामध्ये सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तेव्हा श्रीकृष्णाने युधिष्ठीरला अनेक गोष्टी सांगितल्या, त्यामधील काही निवडक गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत...
1. चंदन -
चंदनाला अत्यंत पवित्र मानण्यात आले आहे. याच्या सुगंधाने वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते. सर्व देवी-देवतांच्या पूजेमध्येसुद्धा चंदनाचे विशेष महत्त्व आहे. चंदनाचा टिळा लावला जातो. हा टिळा लावल्याने मनाला शांती मिळते. चंदन घरात अवश्य ठेवावे, कारण दररोज पूजा करताना देवतांना चंदन अर्पण करणे आवश्यक आहे.
2. शुद्ध पाणी
घरामध्ये पिण्यासाठी नेहमी शुद्ध पाणी ठेवावे आणि घरात कोणताही पाहुणा आल्यामुळे त्याला सर्वात पहिले थंड पाणी पिण्यासाठी द्यावे. असे केल्याने अशुभ ग्रहांचे शुभ फळ प्राप्त होतात.
3. तुळस
हिंदू घरांमध्ये तुळशीचे रोपटे आवश्य असते. घरातील अंगणात तुळस लावणे ही प्रथा शतकानुशतके चालू आहे. शास्त्रामध्ये तुळशीला पूजनीय, पवित्र आणि देवी स्वरूप मानण्यात आले आहे. घरामध्ये तुळस असल्यास सर्व देवी-देवतांची विशेष कृपा आपल्या घरावर राहते.
4. शुद्ध तूप
घरामध्ये शुद्ध तूप नेहमी ठेवावे आणि नियमितपणे याचे सेवन करावे. तुपामुळे शक्ती मिळते आणि शरीर निरोगी राहते. दररोज संध्याकाळी घरामध्ये तुपाचा दिवा लावावा. पूजेमध्येही तुपाचे विशेष महत्त्व आहे. या कारणामुळे घरात तुप असणे आवश्यक आहे.
5. मध
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मध ठेवल्याने वास्तूचे विविध दोष शांत होतात तसेच पूजेमध्ये मध आवश्यक आहे. मध सर्व देवी-देवतांना अर्पण केला जातो. ज्या घरामध्ये नियमितपणे पूजा केली जाते, तेथे मध असणे आवश्यकच आहे.
6. वीणा
बुद्धी आणि विद्येची देवी सरस्वतीचे प्रिय वाद्य वीणा आहे. वीणा घरामध्ये ठेवल्यास सरस्वतीच्या कृपेने सर्व सदस्यांचा बुद्धीचा विकास होईल. कठीण काळातही धैर्य बाळगण्याची प्रेरणा मिळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.