Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Mahabharat stories in hindi story of lord indra and nahush in bhagwat

महाभारताची कथा, जेव्हा धरतीवरील एक सम्राट झाला स्वर्गाचा राजा, त्याने इंद्राच्या पत्नीला पाठवला लग्नाचा प्रस्ताव, घाबरलेली पत्नी गेली बृहस्पतीकडे, ऋषींनी प्रस्ताव स्विकार करण्याचा दिला सल्ला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 24, 2019, 03:59 PM IST

दैत्य रोज स्वर्गावर वेगवेगळे हल्ले करू लागले

 • Mahabharat stories in hindi story of lord indra and nahush in bhagwat

  रिलीजन डेस्क- कथा श्रीमद भागवताची आहे. महाभारतात याचा उल्लेख आहे. जेव्हा मनू वंशाची चौथी- पाचवी पिढी होती.स्वर्गात इंद्राचे राज्य होते. एकदा दुर्वासा ऋषींच्या अपमान केल्यामुळे इंद्राला श्राप मिळाला होता. त्यांनी दिलेल्या श्रापामुळे इंद्र दुर्बळ झाला होता. दुर्बळ इंद्राला पाहून दैत्यानी स्वर्गात हाहाकार माजवला. इंद्र कुठेतरी जाऊन लपून बसला. यामुळे दैत्यांचे धाडस आणखी वाढले. दैत्य रोज स्वर्गावर वेगवेगळे हल्ले करू लागले.

  तेव्हा अन्य देवतांनी सप्त ऋषिंकडे मंत्रणा करूण त्या काळातील सर्वात तेजस्वी राजा नहूषला स्वर्गाचा राजा बनवले. नहूष शुरवीर आणि पराक्रमी होता. त्यांच्या प्रभावाने दैत्य शांत झाले आणि स्वर्गात शांतता आली. पण स्वर्गाचे राजपद आणि इंद्राचे आसन मिळल्यावर काही दिवसातच नहूषवर सत्ता आणि शक्तीची धुंदी चढली. तो आता आपली मनमानी करू लागला. इंद्राचे पद मिळल्यानंतर त्याने इंद्राची पत्नी शचिला ही आपल्या समोर आणण्याचा आदेश दिला. नहूष इंद्राच्या पत्नीला म्हणाला जर इंद्राचे आसन आणि त्याची शक्ती माझ्याकडे आहे तर तू सुद्धा मला आपला पती म्हणून स्विकार कर.

  शचि त्याला यासाठी नकार दिला पण नहूष तिला खूप त्रास देऊ लागला. तेव्हा वैतागून शचि देवगुरू बृहस्पतीकडे गेली, त्यांना घडलेली सर्व गोष्ट सांगितली. नहूषच्या अशा वागण्यामुळे सर्व ऋषीसुद्धा हैराण होते. देवगुरूने शचिला एक युक्ती सांगितली. ते शचिला म्हणाले की, तू नहूषचा प्रस्ताव स्विकार कर आणि त्याला सांग की दर तो सप्त ऋषिंना खांदेकरी बनवून स्वतः त्यांच्या पालखीमध्ये बसून आला तर मी तूला आपला पति स्विकार करील. शचिने हा प्रस्ताव मान्य केला. तिने नहूष राजापर्यंत आपल्या या अटीचा संदेश पाठवला.

  शचिचा संदेश पाहून नहूष खुश झाला आणि त्याने सप्तऋषींना पालखी उचण्याचा आदेश दिला. ऋषिंना नहूषची ऐकणे भाग होते. पण ते सर्व वयोवृद्ध असल्यामुळे त्यांना वेगाने चालता येत नव्हते. तेव्हा नहूषने पालखी समोर चालत असलेल्या अगस्त ऋषिंना लाथ मारून लवकर चालण्यास सांगितले. यावर ऋषींचा संयमाचा बांध तुटला.त्यांनी नहूषला पालखीतून पाडताना लगेच अजगर होण्याचा श्राप दिला. जमिनीवर पडलेला नहूष अजगर झाला होता आणि त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला. स्वर्गाचा राजा होण्याच्या योग्य असलेला व्यक्ती अहंकार आणि चुकीमुळे अजगर झाला होता.

  कथेची शिकवन
  प्रत्येक व्यक्तीला आपल्या योग्यतेनूसार कधीना कधी भाग्य बदलण्याची आणि जीवनात काही करून दाखवायची संधी मिळते. पण संधी मिळूनही काही लोक चुका करतात आणि सर्व काही गमावून बसतात.

Trending