Home | Jeevan Mantra | Life Management | Rishte | Mahabharata about friendship and it's importance

महाभारतातील शिकवण / एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री करण्यापूर्वी त्याच्याविषयी या तीन गोष्टी जाणून घ्या

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 12, 2019, 05:32 PM IST

अशा प्रकारचे व्यक्ती आपल्या मित्रांना वाईट मार्गावर जाऊ देत नाही

 • Mahabharata about friendship and it's importance

  जीवन मंत्र डेस्क - भारतीय धर्म-ग्रंथ मानवाला फक्त देवी-देवतांविषयी नाही तर त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी समजावते. धर्म-ग्रंथांचा जाप केल्याने किंवा ते ऐकल्याने आपल्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत होतात.

  महाभारताच्या वनपर्वात एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत सांगितले आहे.

  श्लोक

  येषां त्रीण्यवदातानि विद्या योनिश्च कर्म च।

  ते सेव्यास्तैः समास्या हि शास्त्रेभ्योपि गरीयसी।।


  मानवाचे शिक्षण आणि ज्ञान
  महाभारतानुसार कोणासोबत मैत्री करताना त्याच्या ज्ञानाचा स्तर काय आहे याबाबत माहीत करून घ्यावे. अनेक लोकांना अभ्यासात रस नसतो. विनाकारण फिरणे, टवाळक्या करणे, दुसऱ्यांची खिल्ली उडवणे असा त्यांचा स्वभाव असतो. अशा लोकांपासून जितके लांब राहता येतील तितके चांगले आहे. चांगले ज्ञान असणारा मनुष्य आपल्या मित्रांना वाईट मार्गावर जाण्यापासून रोखू शकतो.


  त्याच्या कुटुंबाची कुटुंबातील सदस्यांची माहिती
  ज्या व्यक्तीच्या परिवारात दुष्ट, चोर किंवा पापी प्रवृत्तीचे लोक असतील अशा लोकांसोबच चुकीनेही मैत्री करू नये. तो स्वतः कितीही चांगला असला तरी त्याच्या परिवारातील लोकांच्या कर्माचे परिणाम त्याला देखील सोसावे लागतात. यामुळे मैत्री करण्यापूर्वी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा.

  व्यक्तीच्या सवयी आणि काम
  मानवाच्या सवयी आणि त्याच्या वागण्याबाबत जाणून घेणे महत्वपूर्ण ठरते. तुम्ही जर एखाद्याच्या सवयी जाणून न घेता त्याच्याशी मैत्री केली तर त्याचा दुष्परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. त्याच्या सवयी आणि वागण्यामुळे तुम्हाला अपमान सहन सहन करावा लागू शकतो. यामुळे मैत्री करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीच्या सवयी विषयी जाणून घ्या. त्या व्यक्तीमध्ये नशा करणे, चोरी करणे, अती क्रोध करणे यांसारख्या वाईट सवयी असलेल्या व्यक्तीपासून दूर राहिलेले तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

Trending