Home | Jeevan Mantra | Dharm | Mahabharata Bhishma Pitamah special matters of marriage

किती प्रकारचे असतात लग्न, कोणते लग्न मानण्यात आले आहे सर्वश्रेष्ठ ?

रिलिजन डेस्क | Update - Nov 11, 2018, 12:04 AM IST

भीष्म पितामह यांनी युधिष्ठीरला सांगितले होते की, मुलीचे लग्न करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे?

 • Mahabharata Bhishma Pitamah special matters of marriage

  लग्न, हिंदू धर्म संस्कारांमधील एक महत्त्वपूर्ण संस्कार आहे. आपल्या धर्म ग्रंथांमध्ये लग्नाशी संबंधित विविध नियम सांगण्यात आले असून हे आजही प्रासंगिक आहेत. मुलीचे लग्न जमवताना आई-वडिलांनी कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे आणि योग्य वेळेला लग्न जमत नसल्यास अशा स्थितीमध्ये मुलीने काय करावे याविषयी भीष्म पितामह यांनी युधिष्ठिरला सविस्तरपणे सांगितले आहे. याचे वर्णन महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये आढळून येते. तुम्हीही जाणून घ्या, लग्नाशी संबंधित या गोष्टी...


  1. मुलीच्या वडिलांनी सर्वात पहिले मुलाचा स्वभाव, व्यवहावर, कुळ-मर्यादा आणि कामाची माहिती घ्यावी. या सर्व गोष्टी व्यवस्थित असल्यास मुलीचे लग्न अशा मुलाशी करावे. अशाप्रकारे योग्य मुलाला बोलावून त्याच्यासोबत मुलीचे लग्न लावून देणे यालाच उत्तम धर्म ब्राह्म विवाह म्हणतात. आजकालचा 'नियोजित विवाह' (स्थळे पाहून ठरवलेला विवाह) हे 'ब्रह्म विवाहा'चेच एक रूप आहे.


  2. जी कन्या आईची सपिंडी (आईच्या कुटुंबातील) आणि वडिलांच्या गोत्रातील नसेल तिच्यासोबतच लग्न करणे श्रेष्ठ मानले गेले आहे.


  3. देव विवाह - कोणत्या तरी सेवाकार्यासाठी (प्रामुख्याने धार्मिक अनुष्ठानासाठी) पैशांच्या बदल्यात कन्येचे दान देणे, यास 'दैव विवाह' म्हणतात. यात पुरोहिताच्या उपस्थितीत कन्यादान केले जाते. लग्नाच्या इतर विधी सर्वसामान्य लग्नासारख्याच असतात.


  4. आर्ष विवाह - या प्रकारच्या लग्नात कन्यादान करण्यापूर्वी नवरदेव गाई किंवा म्हशी दान करतो. या विवाहाने संबंधित घरात जन्माला येणारे आपत्य आणि पुढील तीन जनरेशन्सना पुण्य मिळते.


  5- कन्येच्या सहमतीशिवाय तिचा विवाह अभिजात्य वर्गांतील वराशी करणे, यास 'प्राजापत्य विवाह' म्हणतात. यात नवरीचे वडील म्हणतात, की या कन्येसोबत धर्म आचरण करा. त्यानंतर वडील कन्येचा हात नवरदेवाच्या हाती देतात. या प्रकारच्या विवाहाने संबंधित घरातील पुढील सहा जनरेशन्सना पुण्य मिळते.


  6. आसुर विवाह - या प्रकारच्या लग्नात नवरदेवाचे कुटुंब नवरीच्या कुटुंबाला भरपाई म्हणून पैसे देतात. कन्येस विकत घेऊन, धन दौलत देऊन विवाह करणे, यास 'आसुर विवाह' म्हणतात.

  7- गांधर्व विवाह - यात केवळ मुलगा आणि मुलगी विवाहाचा निर्णय घेतात. पालकांचा निर्णय प्रक्रियेत समावेश नसतो. दुष्यंताने शकुंतलेशी अशाच प्रकारे 'गांधर्व विवाह' केला होता.


  8- राक्षस विवाह - कन्येच्या सहमतीशिवाय तिचे अपहरण करून जबरदस्तीने विवाह करणे, यास 'राक्षस विवाह' म्हणतात.


  9- कन्येच्या शुद्धीत नसण्याचा (ग्लानी, गाढ निद्रा आदींचा) फायदा घेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे व नंतर विवाह करणे, यास 'पैशाच विवाह' म्हणतात.

Trending