महाभारत : हे / महाभारत : हे 5 काम करण्यात घाई करू नये, जीवनात कायम राहील सुख-शांती

Aug 08,2018 12:03:00 AM IST

संत कबीरदास यांचा एक प्रसिद्ध दोहा आहे - कल करे सो आज कर, आज करै सो अब। म्हणजेच जे काम उद्या करावयाचे आहे ते आजच करून टाकावे आणि जे काम आज करावयाचे आहते ते लगेच करावे. याचा सरळ अर्थ असा होतो की, कोणतेही काम करण्यामध्ये उशीर करू नये. परंतु ही गोष्ट सर्व कामांसाठी लागू होईलच असे नाही. स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही काही कामे अशी आहेत, ज्यामध्ये उशीर करणे चांगले ठरते.


महाभारताच्या एक श्लोकामध्ये सांगण्यात आले आहे की, आपण कोणत्या कार्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा...


रागे दर्पे च माने च द्रोहे पापे च कर्मणि।
अप्रिये चैव कर्तव्ये चिरकारी प्रशस्यते।।


हा श्लोक महाभारताच्या शांतीपर्वामध्ये लिहिण्यात आला आहे. यामध्ये अशी पाच कामे सांगितली आहेत, जी उशिरा केल्याने आपण अडचणींपासून दूर राहू शकतो. या पाच कामांमधील पहिले काम आहे. राग, अत्याधिक मोह, अत्याधिक उत्साह आणि अत्याधिक वासना.


राग
राग एक वाईट गोष्ट आहे. यापासून दूर राहावे. जेव्हाही मनामध्ये राग उत्पन्न झाल्यानंतर थोडावेळ शांत बसावे. अधिक उत्साहात केलेले कामही बिघडण्याची शक्यता राहते. वासनेवर नियंत्रण नाही ठेवले तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. एखाद्यावर जास्त प्रेम करण्यातही घाई करू नये. राग भाव उत्पन्न झाल्यानंतर काही काळ थांबल्यास विचार शांत होतात आणि आपण वाईटापासून दूर राहतो.


दुसरे काम गर्व
दर्प म्हणजे गर्व, ही गोष्ट व्यक्तीला उद्धवस्त करू शकते. या गर्वामुळेच रावण आणि दुर्योधनाचा अंत झाला. गर्व मनामध्ये उत्पन्न होताच याचे एकदम प्रदर्शन करू नये. काही काळ शांत बसावे. असे केल्याने तुमच्यामधील गर्वाची भावना नष्ट होऊ शकते आणि तुम्ही या गोष्टीपासून दूर राहू शकता.


तिसरे काम आहे वाद करणे
जर ताकदवान व्यक्ती एखाद्या कमजोर व्यक्तीसोबत वाद करत असेल तर थोडेफार नुकसान ताकदवान व्यक्तीचेही होतेच. वाद करण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टीसाठी भांडत आहोत याचा शांत डोक्याने विचार करावा. नात्यांमध्ये वाद-विवाद होताच राहतात परंतु परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे जाणवल्यास काही काळ शांत बसावे. यामुळे वादही संपुष्टात येऊ शकतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर 2 कामे कोणकोणती आहेत...

चौथे काम आहे पाप करणे जर मनामध्ये एखादे चुकीचे काम म्हणजचे पाप करण्याचा विचार येत असेल तर ही चिंतेची बाब आहे. चुकीचे काम म्हणजे चोरी करणे, स्त्रियांचा अपमान करणे, धर्माविरुद्ध काम करणे इ. हे काम करण्यापूर्वी थोडावेळ थांबल्यास मनामध्ये चुकीचे काम करण्याचा विचार नष्ट होऊ शकतो. पाप कर्मामुळे व्यक्तीचे सुख आणि पुण्य नष्ट होते.पाचवे काम इतरांचे नुकसान करणे जर तुम्ही एखाद्याचे नुकसान करण्याची योजना आखत असाल तर या योजनेवर काम करण्यापूर्वी थोडावेळ थांबावे. या कामामध्ये जेवढा उशीर कराल तेवढेच चांगले राहील. एखाद्याचे नुकसान करणे अधर्म आहे. असे म्हणतात की, जे लोक दुसऱ्यांसाठी खड्डा खोदतात, तेच त्या खड्ड्यामध्ये पडतात. यामुळे दुसऱ्यांचे अहित करण्यापूर्वी थोडावेळ अवश्य थांबावे.
X