आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या श्रेष्ठ भविष्यासाठी सुख-सुविधांपेक्षा संस्कारांकडे जास्त लक्ष देणे आवश्यक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आई-वडिलांनी सुख-सुविधांपेक्षा संस्कारांकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. मुलांवर प्रेम करणे आणि मोह असणे ठीक आहे परंतु गरजेपेक्षा जास्त प्रेम आणि मोह अडचणींमध्ये वाढ करतो. मुलांच्या पालनपोषणामध्ये शिक्षण आणि संस्काराकडे विशेष लक्ष द्यावे. या दोन्ही गोष्टींमध्ये करण्यात आलेला निष्काळजीपणा मुलांचे भविष्य बिघडवू शकतो.

  • संस्कारांमुळेच मुलांना योग्य आणि अयोग्य गोष्टींमधला फरक समजू शकतो. मुलांना हे समजावून सांगावे की, सत्याच्या मार्गावर अडचणी येणार परंतु लक्ष्यापर्यंत पोहोचल्यानंतर सुखासोबत शांतीही मिळेल. चुकीच्या कामामुळे मानसिक सुख आणि शांती मिळत नाही. महाभारतामध्ये कुंतीने पांडवांना कठीण परिस्थतीमध्येसुद्धा श्रेष्ठ विद्या आणि संस्कार दिले. यामुळे पांडव अधर्मापासून दूर राहिले.

  • महाभारतामध्ये एकाच कुटुंबाचे दोन भाग सांगण्यात आले आहेत. एक कौरव आणि दुसरे पांडव. कौरवांमध्ये धृतराष्ट्र, गांधारी आणि त्यांचे 100 पुत्र मुख्य आहेत. पांडवांमध्ये आई कुंती आणि पाच पांडव मुख्य आहेत. कौरवांकडे सर्वप्रकाराचे सुख आणि ऐश्वर्य होते परंतु आई-वडिल अत्याधिक मोह आणि प्रेमामुळे मुलांना योग्य शिक्षण आणि संस्कार देऊ शकले नाहीत. दुसरीकडे कुंतीने पांडवांना योग्य शिक्षण आणि संस्कार दिले. महाराज पांडू आणि माद्रीच्या मृत्यूनंतर कुंतीनेच पाच पांडवांचे पालनपोषण केले. पांडवांकडे कौरवांप्रमाणे सुख-सुविधा नव्हत्या, तरीही शिक्षण आणि संस्कारामुळे ते धर्म मार्गावर चालले आणि श्रीकृष्णाची कृपा प्राप्त केली.

  • जे आई-वडील आपल्या मुलांच्या शिक्षण आणि संस्काराकडे पूर्ण लक्ष देतात, त्यांचे मुलं आजीवन सुखी राहतात. नेहमी चुकीच्या कामापासून दूर राहतात आणि घर-कुटुंब तसेच समाजात मान-सन्मान प्राप्त करतात.