• Home
  • Gossip
  • 'Mahabharata' fame Mukesh Khanna is celebrating his 61st birthday today

Birthday Special / Birthday Special : 'महाभारत'मध्ये मुकेश खन्ना यांना ऑफर झाला होता दुर्योधनाचा रोल, त्यांना अर्जुन किंवा कर्ण व्हायचे होते 

पहिला चित्रपट होऊ शकला नाही रिलीज... 

दिव्य मराठी वेब

Jun 23,2019 11:34:26 AM IST

बॉलिवूड डेस्क : 1988 चा लोकप्रिय पौराणिक शो 'महाभारत'मध्ये भीष्म पितामहांची भूमिका साकरल्याने प्रसिद्ध झालेले मुकेश खन्ना 61 वर्षांचे झाले आहेत. ज्यावेळी त्यांनी भीष्मचा रोल केला होता, त्यावेळी ते केवळ 30 वर्षांचे होते. पण आजही लोकांच्या आठवणीत ती भूमिका आहे. तुम्हाला माहित आहे का की, बी. आर. चोप्रानेही पहिल्यांदा त्यांना भीष्मचा रोल ऑफर केला नव्हता आणि ना त्यांनी या भूमिकेची डिमांड केली होती.

नाकारला होता दुर्योधनचा रोल...
कास्टिंग डायरेक्टर गूफी पेंटलने मुकेश यांना त्यांच्या चांगल्या उंचीमुळे दुर्योधनाची भूमिका ऑफर केली होती. पण त्यांनी त्याला नकार दिला. याचेर कारण मुकेश यांनी सांगितले की, त्यांना निगेटिव्ह रोल कार्याचा नव्हता. नंतर शोच्या को-डायरेक्टर रवी चोप्राने त्यांना द्रोणाचार्यची भूमिका देण्याचे प्लॅनिंग केले मुकेश यांनी ऑडिशन द्रोणाचार्यच्या लुकमी,अधे दिली होती. पण त्यांना अर्जुन किंवा कर्णचा रोल करायचा होता.

भीष्मचा मेकअप बदलला चोप्रांचा विचार...
बी. आर. चोप्रा यांनी महाभारतच्या मेकिंग व्हिडिओमध्ये सांगितले होते की, त्यांनी मुकेश यांना द्रोणाचार्यच्या भूमिकेमध्ये घेतले होते. पण नंतर त्यांचे मन बदलले. ते म्हणाले होते, "मी मुकेशला म्हणालो मेकअप रूममध्ये जा आणि भीष्म बनून ये. जेव्हा तो आला तेव्हा मी हैरान झालो. त्याला पाहून, त्याची टेस्ट घेतली आणि वाटले की, हे तर उत्तमच आहे. असे मी त्याला भीष्मच्या भूमिकेत आणले."

पहिला चित्रपट रिलीज नाही होऊ शकला...
मुकेश खन्ना यांनी मुंबईच्या सेंट जेबियर कॉलेजमधून शिक्षण घेतले होते. ते प्लास्टिक इंजीनियर बनू इच्छित होते. पण नंतर त्यांनी एलएलबीला अॅडमिशन घेतले. सांगितले जाते की, मुकेश यांचे भासू त्यांना तिची आणि चित्रपटाच्या जगात घेऊन आले होते. त्यांना पहिला ब्रेक थिएटर डायरेक्टर नरिंदर बेदी यांनी चित्रपट 'खूनी'ने दिला होता. जो कधीच रिलीज होऊ शकला नाही. झाले असे की, चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच बेदी यांचे निधन झाले होते. सध्या ते एंटरटेनमेंट इंडस्ट्रीपासून दूर आहेत. शेवटचे त्यांना टीव्ही शो वारिस (2016) मध्ये पहिले गेले होते. फेब्रुवारी 2018 मध्ये मुकेश यांनी चिल्ड्रन फिल्म सोसाइटी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या दोन महिने अगोदरच राजीनामा दिला.

X
COMMENT