आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

श्रीमंत असो वा निर्धन कधीही मित्राचा अपमान करू नये, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागतो

aurangabad6 महिन्यांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

महाभारतामध्ये पृषत नावाचा एक राजा भारद्वाज मुनींचे मित्र होते. त्यांच्या मुलांचे नाव द्रुपद होते. द्रुपदसुद्धा भारद्वाज मुनींच्या आश्रमात राहून द्रोणाचार्यसोबत शिक्षण घेत होता. द्रुपद आणि द्रोण चांगले मित्र होते. एक दिवशी द्रुपद द्रोणला म्हणाला की, मी राजा झाल्यानंतर तू माझ्यासोबत राहा. माझ्या राज्य, संपत्ती आणि सुखावर तुझासुद्धा समान अधिकार राहील. पृषत राजाचा मृत्यू झाल्यानंतर द्रुपद पांचाळ देशाचा राजा बनला. इकडे द्रोणाचार्य वडिलांच्या आश्रमात राहून तपश्चर्या करू लागले. त्यांचा विवाह कृपाचार्य यांची बहिण कृपीसोबत झाला. कृपीपासुन त्यांना अश्वत्थामा नावाचा पराक्रमी पुत्र झाला. एक दिवशी इतर ऋषींच्या मुलांना दुध पिताना पाहून अश्वत्थामा दुध पिण्याचा हट्ट करू लागला. परंतु गाय नसल्यामुळे द्रोणाचार्य त्याला दुध देऊ शकले नाहीत आणि यामुळे त्यांना खूप दुःख झाले. द्रोणाचार्यांना द्रुपद राजा झाल्याचे समजल्यानंतर लहानपणीचे त्याचे वचन त्यांना आठवले आणि ते द्रुपदला भेटण्यासाठी गेले. तेथे गेल्यानंतर द्रोणाचार्य द्रुपदला म्हणाले की, मी तुझा लहानपणीचा मित्र आहे. द्रोणाचार्यांचे हे वाक्य ऐकून राजा द्रुपदने त्यांना अपमानित करून एक राजा आणि सामान्य ब्राह्मण कधीही मित्र होऊ शकत नाही असे सांगितले. राजा आणि गरीबामध्ये कशाची मैत्री? त्यावेळी आपण दोघेही समान होतो यामुळे मैत्री होती. आता मी धनी असून तू निर्धन आहेस. द्रुपदचे बोलणे द्रोणाचार्यांना आवडले नाही आणि या अपमानाचा बदला घेण्याचा विचार करत ते हस्तिनापुरला आले. त्यानंतर ते काही दिवस गुप्त रुपात कृपाचार्य यांच्याकडे वास्तव्यास राहिले. एके दिवशी सर्व राजकुमार मैदानात चेंडू खेळत होते. तेवढ्यात तो चेंडू एका विहिरात जाऊन पडला. राजकुमारांनी चेंडू बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांना ते शक्य झाले नाही. राजकुमारांचा प्रयत्न द्रोणाचार्य दुरून पाहत होते. त्यांनी राजकुमारांना बोलावून सांगितले की, मी तुमचा चेंडू विहिरीतून काढून देतो परंतु यासाठी तुम्हाला माझ्या जेवणाची व्यवस्था करावी लागेल. द्रोणाचार्यांनी अभिमंत्रित नाण्याच्या माध्यमातून विहिरीतून चेंडू बाहेर काढला. हे पाहून सर्व राजकुमारांना खूप आश्चर्य वाटले. त्यांनी ही सर्व घटना पितामह भीष्म यांना जाऊन सांगितली. हे एकूण पितामह यांना समजले की, ते महापुरुष द्रोणाचार्य आहेत. त्यानंतर पितामह भीष्म यांनी द्रोणाचार्यांना आदरपूर्वक हस्तिनापुरमध्ये आणले आणि त्यांना कौरव आणि पांडवांना शस्त्र-अस्त्र विद्या शिकवण्याची जबाबदारी सोपवली. कौरव आणि पांडवांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर द्रोणाचार्यांनी त्यांना पांचाळ देशाच्या द्रुपद राजाला बंदी बनवून आणण्यास सांगून हीच माझ्यासाठी गुरुदक्षिणा ठरेल असे सांगितले. पहिले कौरवांनी राजा द्रुपदवर आक्रमण करून त्यांना बंदी बनवण्याचा प्रयत्न केला परंतु ते यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर पांडवानी अर्जुनाच्या पराक्रमाने राजा द्रुपदला बंदी बनवून द्रोणाचार्यांकडे आणले. त्यानंतर द्रोणाचार्यांनी अर्धे राज्य द्रुपदला परत केले आणि अर्धे स्वतःजवळ ठेवले. अशाप्रकारे राजा द्रुपद आणि द्रोणाचार्य एकसमान झाले.

0