आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापुत्र भीष्म यांचे वडील होते शांतनू, आपल्या वडिलांचे लग्न लावले होते सत्यवतीसोबत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भीष्म पितामह यांच्या वडिलांचे नाव शांतनु होते. एकदा शांतनु शिकार करताना गंगातटावर पोहोचले. तेथे त्यांना एक परम सुंदर स्त्री दिसली. त्या स्त्रीला पाहून शांतनु तिच्यावर मोहित झाले. शांतनुने तिला लग्नाची मागणी घातली. त्या स्त्रीने लग्नाला होकार दिला आणि एक अटही घातली की, तुम्ही कधीही मला कोणतेही काम करण्यासाठी आडवणार नाहीत, असे केल्यास त्याचक्षणी मी तुम्हाला सोडून निघून जाईल. शांतनुने अट मान्य करून तिच्याशी लग्न केले. त्यानंतर दोघांचे वैवाहिक आयुष्य सुखात व्यतीत होऊ लागले. शांतनुच्या घरात सात मुलांनी जन्म घेतला परंतु सर्व मुलांना पत्नीने गंगा नदीमध्ये टाकले. शांतनु हे सर्व पाहूनसुद्धा शांत होते कारण पत्नीला दिलेले वचन ते मोडू शकत नव्हते. आठवा मुलगा झाल्यानंतर त्यालाही पत्नी गंगेत टाकत असताना शांतनुने तिला अडवले आणि विचारले, तू असे का करत आहेस ? त्या स्त्रीने सांगितले की, मी देवनदी गंगा असून ज्या मुलांना मी यामध्ये टाकले आहे ते सर्वजण वसु होते. यांना वशिष्ठ ऋषींनी शाप दिला होता. यांना मुक्त करण्यासाठी मी या सर्व मुलांना नदीमध्ये प्रवाहित केले आहे. तुम्ही अट मोडल्यामुळे मी आता जात आहे. त्यानंतर गंगा शांतनुच्या आठव्या मुलाला सोबत घेऊन गेली. शांतनुचा आठवा मुलगा शांतनुच्या आठव्या मुलाला गंगा घेऊन गेल्यानंतर शांतून खूप उदास राहू लागले. काही काळानंतर शांतनु गंगेच्या काठावर फिरत असताना त्यांना जाणवले की, गंगा नदीमध्ये पाणी खूप कमी राहिले असून ते प्रवाहित होत नाही. हे रहस्य जाणून घेण्यासाठी ते थोडसे पुढे गेले. तेथे त्यांना एक युवक अस्त्रांचा अभ्यास करताना दिसला आणि त्याने बाणांच्या प्रभावाने गंगेचे पाणी आडवले होते. हे दृश्य पाहून शांतनुने चकित झाले. तेवढ्यात तेथे शांतनुची पत्नी गंगा प्रकट झाली आणि सांगितले की, हा तुमचा आठवा मुलगा असून याचे नाव देवव्रत आहे. याने वशिष्ठ ऋषींकडून वेदांचे अध्ययन केले असून परशुरामांकडून सर्व शस्त्रांची विद्या आत्मसात केली आहे. हा श्रेष्ठ धनुर्धर असून याचे तेज इंद्रासमान आहे. देवव्रतचा परिचर देऊन गंगा त्याला शांतनुकडे सोडून गेली. याच देवव्रतने शांतनूचे यांचे लग्न सत्यवतीसोबत करण्यासाठी आजीवन ब्रह्मचारी राहण्याची भीषण प्रतिज्ञा केली होती. यामुळे देवव्रतचे नाव भीष्म पडले. भीष्म यांनी शेवटपर्यंत आपल्या वडिलांच्या वंशाचे रक्षण केले.

बातम्या आणखी आहेत...