Home | Jeevan Mantra | Dharm | mahabharata, unknown facts about mahabharata, lord krishna and gandhari

महाभारतानंतर कसा झाला धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंतीचा मृत्यू...?

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 09, 2019, 07:12 PM IST

युद्धानंतर 15 वर्ष महालात राहिले धृतराष्ट्र आणि गांधारी

 • mahabharata, unknown facts about mahabharata, lord krishna and gandhari

  जीवनमंत्र डेस्क- महाभारतात कौरवांच्या पराभवानंतर युधिष्ठीर राजा झाला. त्यानंतर धृतराष्ट्र आणि गांधारी पांडवासोबत राहायला गेले. महालात कुंती या दोघांचीही खूप सेवा करत असे. पण भीमाला या गोष्टींचा खूप त्रास होत असे. त्यामुळे तो नेहमी धृतराष्ट्राला टोमणे मारायचा. जवळपास 15 वर्ष असेच सुरू होते. त्यामुळे एक दिवस धृतराष्ट्र आणि गांधारीने वनप्रस्थ म्हणजे जंगलात तपस्या करण्याचा निश्चय केला आणि महालातून निघून गेले. त्यांच्यासोबत कुंतीनेही जाण्याचा निर्णय घेतला.

  नारदाने दिली युधिष्ठिरला दोघांच्या मृत्यूची बातमी
  तिघे जंगलात गेल्याच्या तिन वर्षानंतर नारदमुनी युधिष्ठिराकडे गेले. त्याने सन्माने नारदांचा आदर सत्कार केला. युधिष्ठिराला माहित होते की नारदांना सर्व ब्रम्हाडाची माहिती असते. त्यामुळे त्यांनी धृतराष्ट्र, गांधारी आणि आपली आई कुंतीविषयी विचारपूस केली की, हे तिघे कुठे आहेत आणि कसे आहेत?

  नारद मुनिंनी सांगितले की, धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती हरिद्वारमध्ये तप करत होते. एक दिवस गंगा स्नान करून आश्रमात येत असताना जंगलात भयंकर आग लागली. दुर्बळतेमुळे तिघांनाही तेथून पळता आले नाही. तेव्हा त्याच आगीत प्राणाचा त्याग करण्याचा विचार करून तिथेच एकाग्रचित्त होऊन बसले. आणि यात धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंतीचा मृत्यू झाला.

  युधिष्ठिराने केले श्राद्ध
  धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंतीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर पांडवांच्या महालात शोककळा पसरली. सर्वजण दुःखी होते, पण नारदांनी सर्वाचे सांत्वन केले. त्यानंतर युधिष्ठिराने विधिपूर्वक तिघांचेही श्राद्ध केले आणि दान-दक्षिणा देऊन त्यांच्या आत्म्याला शांति मिळावी अशी प्रार्थना केली.

Trending