नीती / महाभारतानुसार निरोगी राहणे सर्वात मोठे सुख, अशाच इतरही 5 गोष्टींचे आजही खास महत्त्व

कर्जापासून दूर राहणार व्यक्ती असतो सर्वात जास्त सुखी

दिव्य मराठी

Jul 13,2019 12:05:00 AM IST

महाभारतामध्ये धृतराष्ट्रचे मंत्री विदुर यांनी विविध नीती सांगितल्या आहेत. या नीती केवळ त्या काळातच उपयोगी नव्हत्या तर आजही यांचे खूप महत्त्व आहे. या नीतींचा दैनंदिन जीवनात अवलंब केल्यास मनुष्याचे जीवन सुखी आणि प्रसन्न राहू शकते. विदुर नीतीनुसार ज्या मनुष्याजवळ या 6 गोष्टी असतात, तो अत्यंत सुखी आयुष्य जगतो. खालील श्लोकाच्या माध्यमातून विदुराने या सहा गोष्टी सांगितल्या आहेत...


आरोग्यामानृण्यमविप्रवासः सद्धिर्मनुष्यैः सह स्मप्रयोगः।
स्वप्रत्यया वृत्तिरभीतवासः षड् जीवनलोकस्य सुखानि राजन्।।


पहिली गोष्ट -
निरोगी (स्वस्थ) शरीर -

जीवनात सदैव सुखी राहण्यासाठी शरीर तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. शरीराला एखादी व्याधी असेल तर तुम्ही व्यवस्थित काही खाऊ-पिऊ शकत नाहीत. अशा अवस्थेमध्ये तुम्ही जीवनातील अनेक सुखांपासून वंचित राहू शकता. जर तुम्हाला सामान्य आजार असेल तर त्याचेही त्रास सहन करावा लागतो. आजार मोठा असेल तर दवाखाना, औषधी इ. गोष्टींमध्ये पैसा आणि वेळ खर्च होतो. निरोगी शरीर असणारा व्यक्ती कोणतेही काम करण्यास सक्षम असतो. गरज पडल्यास तो शारीरिक श्रम करू शकतो, याउलट रोगी व्यक्ती हे करू शकत नाही. यामुळे शरीर निरोगी असणे आवश्यक आहे.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या श्लोकाचा सविस्तर अर्थ....

कर्ज घेऊ नये मनुष्याने स्वतःच्या उत्पन्न असेल तेवढ्याच इच्छा ठेवाव्यात. अनेक लोक मनावर नियंत्रण ठेवत नाहीत. स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इतरांकडून कर्ज घेतात. इतरांकडून कर्ज घेऊन प्राप्त केलेल्या सुविधा कधीच सुख देत नाहीत. अनेकवेळा लोक घेतलेले कर्ज वेळेवर फेडू शकत नाहीत आणि यामुळे स्वतःसोबतच कुटुंबाला अडचणीत आणतात. जो मनुष्य कर्जापासून दूर राहतो, तो नेहमी सुखी राहतो. स्वतःच्या देशात राहणे अनेक कारणांमुळे लोक स्वतःचा देश सोडून इतर देशात वास्तव्य करतात. असे करण्यामागे कोणतेही कारण असो, परंतु आपल्या देशात राहण्याचे जे सुख आहे ते इतर कोणत्याही ठिकाणी मिळू शकत नाही. जो मनुष्य स्वतःचे पूर्ण आयुष्य आपल्या लोकांमध्ये देशात व्यतीत करतो तो खूप सुखी राहतो.चांगल्या लोकांची संगत जो व्यक्ती चांगल्या आणि विद्वान लोकांच्या संगतीत राहतो, त्याच्यासोबत वेळ व्यतीत करतो त्याला खूप सुखी मानले जाते. वाईट लोकांच्या संगतीचा परिणाम वाईटच होतो. जे लोक दुष्ट आणि हिंसक लोकांच्या संगतीत राहतात त्यांना भविष्यात विविध अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे नेहमी चांगल्या संगतीमध्ये राहावे.आयुष्य जगण्यासाठी कोणावरही अवलंबून राहू नये जो व्यक्ती स्वतःचे आणि कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी स्वतः पैसा कमावण्यास सक्षम असेल, तोच सुखी आयुष्य जगू शकतो. अनेक लोक स्वतःचे आयुष्य जगण्यासाठी इतरांवर अवलंबून राहतात. अशा लोकांना स्वाभिमान नसतो आणि इतरांच्या नजरेत त्यांना मान-सन्मानही नसतो. यामुळे स्वतः कष्ट करून आयुष्य जगावे.भयमुक्त जगणे ज्या व्यक्तीचे स्वतःपेक्षा जास्त ताकदवान व्यक्तीशी वैर असते, तो प्रत्येक क्षणाला त्याच शत्रूच्या विचारात असतो. ताकदवान शत्रू त्याला आणि त्याच्या कुटुंबाला नुकसान पोहचवू शकतो. एखाद्या भीतीखाली जगणारा मनुष्य कधीच जीवनाचा पूर्ण आनंद घेऊ शकत नाही. यामुळे जो व्यक्ती भयमुक्त जीवन जगतो, त्याला सर्वात सुखी मानले जाते.
X