आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एकच प्रश्न सारखा विचारताय, मुर्ख आहात का ?' माढ्यात प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर भडकले महादेव जानकर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा-मुख्यमंत्र्यानी सांगितलं तर कमळाच्या चिन्हावर आपण निवडणुक लढवाल का? माढ्यातील एका पत्रकारांने विचारलेल्या या प्रश्नावर पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर चांगलेच भडकले. म्हणाले," किती वेळा हा प्रश्न पत्रकार मला विचारता आहेत? तुम्ही मुर्ख आहात काय?" असे विधान जानकर यांनी केले. पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह-खालच्या पातळीवरचे विधान केल्याबद्दल जानकर यांचा पत्रकारांमधुन निषेध केला जात आहे. 



माढा शहरातील शासनमान्य शिवलाल रामचंद वाचनालयास आज(शनिवार) पशु संवर्धन मंत्री जानकर यानी भेट दिली. तसेच,  वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथमित्र, प्राणी मित्र विलास शहा यांच्याशी चर्चाही केली. त्यांच्या या भेटीनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. सध्या सुरू असलेल्या भाजपा-शिवसेना पक्ष प्रवेशावर म्हणाले की, "पक्ष वाढीच्या दृष्टीने जो तो पक्ष प्रयत्न करतोय. ज्या भागात पक्ष कमजोर आहे तिथे याचा मोठा फायदा होईल. राज्यात केंद्रात सत्ता असल्याने पक्ष प्रवेशाचे वारे असे सुरुच राहील." असे मत त्यांनी व्यक्त केले.




मुख्यमंत्र्यानी सांगितले तर कमळ चिन्हावर निवडणुक लढवली जाईल का ? या प्रश्नावर ते पत्रकारांवरच भडकले. म्हणाले की, "मी हजार वेळा सांगत आलोय तुम्ही ऐंकल असेल ना? सारखं तेच विचारायला पत्रकार मुर्ख आहेत काय? मी पक्ष कशाला काढलाय, आमच्या पक्षाच्या चिन्हावरच लढू." असे जानकर म्हणाले. 



धनगर समाजाला आरक्षण मिळाले- जानकर
मंत्रीपद मिळाले, आता धनगर आरक्षणाचे काय ? असे विचारले असता, धनगरांना आरक्षण मिळालंय असं अजब वक्तव्य करत आदिवासीच्या योजना लागू झाल्यात की असे ते म्हणाले. मुळात आदिवासी समाजाच्या 22 योजनांमध्ये धनगरांना लाभ देण्यासाठी राज्य शासनाने 1 हजार कोटींची आर्थिक तरतुद केली आहे. यावर अमंल झालेला नसल्याने यांचा लाभ एकाही धनगराला मिळालेला नाही. अशातच धनगर आरक्षण जाहीर झालेले नसताना जानकरांनी धनगरांना आरक्षण मिळाल्याचे म्हटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.