आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्ष संघटन वाढवण्यासाठी कामाला लागा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा - जिल्ह्यामध्ये पक्षाची स्वतंत्र ओळख व ताकद असेल तरच अन्य बढे पक्ष तुमची दखल घेतील. त्यामुळे पक्ष संघटन व पक्षाची ताकद वाढवण्यासाठी गाव, तालुका व जिल्हा पातळीवर कामाला लागा, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व दुग्धविकास, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना केले. 


स्थानिक सैनिकी मंगल कार्यालय बुलडाणा येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना महादेव जानकर म्हणाले, आगामी निवडणुका पाहता जिल्हा परिषद व पंचायत समिती गणानुसार पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांच्या बैठक आयोजित करून समस्या जाणून घ्याव्यात. प्रास्ताविकात विदर्भ प्रदेशाध्यक्ष अनिल जगताप यांनी २ महिन्यात जिल्ह्यात रासपचे पक्ष संघटनांचे काम मोठ्या प्रमाणात वाढले असून अनेक पदाधिकाऱ्यांना तालुका पातळीवर नियुक्त्या देण्यात आल्या.

 

शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा प्रशासन व शासनाकडे पाठपुरावा करून गावोगावी जावून त्यांच्या समस्या व संघटन बांधणीचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तर अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राजपूत यांनी जिल्ह्यातील संघटनेबद्दल माहिती दिली. तर महासचिव बाळासाहेब दौलतडे यांनी तालुकानिहाय उपस्थिती विचारून आजच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला गैरहजर असणाऱ्यांना सोबत घेवून १० जानेवारी रोजी नागपूर येथील रासपच्या मेळाव्याला बुलडाणा जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी केले. या कार्यक्रमास सुनीता डोंगरे, धनश्री काटीकर, एन. टी. रिंढे, दुर्गेश पाटील, विनाताई जायभाये, विजय तोमर, प्रकाश राजपूत, बळीराम पाटील, विठ्ठल परिहार, भारत जोगदंड, गणेश देशमुख, सिद्धार्थ पैठणे, दुर्गा जगताप, शारदा जगताप, लता राजपूत, भागूबाई जगताप, सोजरबाई ब्राम्हणे, पंचफुला जगताप, लिलाबाई इंगळे उपस्थिती होती. संचालन कैलास गाडेकर यांनी तर आभार संदीप राजपूत यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...