आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती असल्याने महायुतीत आहे', भाजपचा प्रचार करणार नसल्याचा घेतला पवित्रा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भाजप शिवसेना युती ठरली आणि काही काळ जागावाटपावरुन दोन्ही पक्षात बिनसले होते. पण, अखेर जागा वाटप झाली आणि शिवसेनेला 124 तर भाजपने 164 जागा घेतल्या. त्यापैकी 14 जागा मित्रपक्षांना सोडल्या खऱ्या. पण, यातही काही जागांवर मित्रपक्षांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर नाराज झाले. त्यानंतर आता त्यांनी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार नसल्याचे म्हटले आहे.महायुतीच्या जागावाटपामध्ये मित्रपक्षांना भाजपच्या जागांवर लढण्यास सांगण्यात आले. पण, त्यात रासपच्या दोन उमेदवारांना त्यांच्या चिन्हावर लढण्यास भाजप तयार झाली. त्यानंतर आता रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी रासपचे जे दोन उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत, त्यांचा प्रचार करणार नसल्याचे म्हटले आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदमध्ये ते बोलत होते.पत्रकार परिषदेत बोलताना जानकर म्हणाले की, "रासप आणि भाजप यांच्यातली भांडणं ही घरातले आहे. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती असल्याने महायुतीत आहे. रासप सोडून भाजपच्या चिन्हावर उभे राहणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला जाणार नाही.  महायुतीमध्ये भाजप सर्वात ताकतवान असल्याने तो सर्वांचा मोठा भाऊ आहे आम्हाला एक जागा दिली तरी आम्ही समाधानी आहोत." असे जानकरांनी स्पष्ट केले.