आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElectioin : उत्तर भारतीयांच्या कजरी महोत्सवात सहभागी झाले आदित्य ठाकरे, लोकांनी गमछा घालून केले त्यांचे स्वागत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता शिवसेना मुंबई आणि आसपास राहणाऱ्या 40 लाख उत्तर भारतीयांना जोडण्याचे काम करत आहे. सोमवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उत्तर भारतीयांच्या कजरी महोत्सवात सहभागी झाले. यावेळी उत्तर भारतीयांनी लाल रंगाचा गमछा घालून त्यांचे स्वागत केले. गमछाला उत्तर भारतीय समाजाचे प्रतिक मानले जाते. दिंडोशी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन उत्तर भारतीयांचे मानले जाणारे नेते आनंद दुबे आणि अशोक तिवारी यांनी केले होते. 

मुंबईत 'कजरी' आणि देशात 'केसरी' महोत्सव 
यावेळी आदित्य ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना संबोधित केले. मुंबई कजरी आणि देशात केसरी महोत्सव सुरु आहे. यामुळे भगव्या रंगाचा संदेश संपूर्ण देशात पोहचत असल्याचे ते म्हणाले. 
 

अयोध्या दौऱ्यात नवीन शिकवण मिळाली
पुढे बोलताना ते म्हणाले की, 'उत्तर प्रदेश दौऱ्यात उत्तर भारतीयांकडून खूप सन्मान आणि प्रेम मिळाले. अयोध्या दौऱ्यात 'रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वजन न जाई' ही शिकवण मला मिळाली. शिवसेनेची सुद्धा अशीच रीत आहे. जोपर्यंत अयोध्येत रामललाचे मंदित बनत नाही तोपर्यंत पक्ष गप्प बसणार नाही.'

आदित्य ठाकरे उत्तर भारतीय लोकांशी संवाद साधतील - शिवसेना नेता
आदित्या ठाकरेंच्या मते, शिवसेनेने राम मंदिरापासून देशातील शेतकऱ्यांपर्यंत जे काही काम करण्याचे वचन दिले होते ते कोणत्याही पूर्ण करण्यात येईल. दरम्यान आनंद दुबे म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे काम पाहून उत्तर भारतीय समाज मोठ्या संख्येने शिवसेनेसोबत येत आहे. आदित्य ठाकरे लवकरच उत्तर भारतीय समाजाच्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधू शकतात.

बातम्या आणखी आहेत...