आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MahaElection: 14 More Sambhaji Brigade Candidates Announced; Will Contest 50 Seats In The Assembly Election

संभाजी ब्रिगेडचे आणखी १४ उमेदवार जाहीर; विधानसभेच्या ५० जागा लढवणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेडने १४ उमेदवारांची दुसरी यादी साेमवारी जाहीर केली. सुमारे ५० मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याचा या संघटनेचा मानस अाहे. तसेच भाजप अणि  काँग्रेस या दाेन्ही पक्षांशी आघाडीबाबत बाेलणी सुरू आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डाॅ. शिवानंद भानुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘जाे पक्ष आम्हाला सन्मानजनक जागा देईल त्यांच्याशी आम्ही आघाडी करू. सत्ता मिळत असल्यास काही तडजोडी करण्यासही आम्ही तयार आहाेत.’
 
संभाजी ब्रिगेडच्या वतीने यापूर्वी १५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आणखी १४ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष वैशाली खोपडे, रेणुका सोमवंंशी, बाबासाहेब दाभाडे, नितेश शेलार, संजय सोमवंशी, वैभव बोडखे, राम भगुरे, काकासाहेब दानवे यांची उपस्थिती होती.

भानुसे यांनी सांगितले की, ‘२५ वर्षांपासून दुसऱ्यांना जिंकवण्यासाठी आम्ही लढलाे. या वेळी स्वत: जिंकण्यासाठी निवडणूक लढवणार आहाेत. त्यासाठी राज्यभर संपर्कप्रमुखांनी मुलाखती घेतल्या आहेत. समविचारी घटकांना एकत्र घेऊन तिसरी आघाडी निर्माण करण्यात येईल. तसेच भाजपसोबतही चर्चा सुरू आहे. त्यामुळे सत्ता मिळत असेल तर विधानसभेत आवाज उठवण्यासाठी काही तडजोडी करण्यासदेखील तयार आहाेत. मात्र सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर निवडणूक लढवण्यासही आम्ही सज्ज आहाेत.’

‘लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्यासोबत दहा बैठका झाल्या. मात्र काँग्रेसने चर्चेत झुलवत ठेवत आम्हाला फसवले. या वेळी आमचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही तयारी केली असून आधी उमेदवार घोषित केले आहेत. जर आघाडीत सन्मानजनक तोडगा निघाला तर आमचे केडर असल्यामुळे जागेनुसार उमेदवार माघार घेतील,’ असेही भानुसे यांनी स्पष्ट केले.  

औरंगाबाद पूर्वमधून रमेश गायकवाड, परळीतून गाेविंद पाेतंगले
संभाजी ब्रिगेडचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड औरंगाबाद पूर्वमधून निवडणूक लढणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातून या एकमेव जागेवर संभाजी ब्रिगेड लढणार आहे.  रिसोडमधून डॉ. प्रशांतकुमार मावंडे, वाशीम मंगरूळपीर- राहुल बलखंडे, वणी- अजय धोबे, लोहा कंधार- सुभाष कोल्हे, देगलूर- सूर्यकांत चंद्रे, मुखेड -बालाजी आगलावे, कल्याण पश्चिम- डॉ. अमितकुमार गोवीलकर, अाेवळ- माजिवाडा- विकास मुकादम, भोर- पंढरीनाथ सोंडकर, पुणे कॅन्टोनमेन्ट- रंजना जाधव, माजलगाव- छत्रभुज देशमुख, परळी- गाेविंद पोतंगले, औसा- अभिमन्यू पवार या उमेदवारांच्या नावांची घाेषणा करण्यात अाली.

बातम्या आणखी आहेत...