आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection : निवडणुकीत अभिनेता संजय दत्त करणार ‘रासप’चा प्रचार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बाॅलीवूड अभिनेता लवकरच राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार अाहे. खरे तर अाजच्या कार्यक्रमातच पक्षप्रवेश हाेणार हाेता, पण संजय दुबईत असल्याने हा कार्यक्रम हाेऊ शकला नाही. विधानसभा निवडणुकीत ताे रासप उमेदवारांच्या विधानसभेच्या प्रचाराला हेलिकाॅप्टरने येणार आहे, असे जानकर यांनी सांगितले. आता संजय दत्त २५ सप्टेंबर रोजी प्रवेश करेल. या वेळी संजय दत्तने रासपला व्हिडिअाेद्वारे शुभेच्छा दिल्या. 
 

हेलिकाॅप्टर आवडीचे 
> तरुणपणी घर सोडल्यावर जानकर दोन दशकांनंतर पडसावळे गावात गेले ते हेलिकाॅप्टर घेऊनच.
> २०१४ लोकसभा व विधानसभा निवडणुकांत जानकर यांनी हेलिकाॅप्टरने प्रचार दौरे केले हाेते.
> रासपचे नेते रत्नाकर गुट्टे (बीड) हेसुद्धा हेलिकाॅप्टर स्वत:च्या गावात आणल्याने प्रसिद्धीच्या झोतात आले होते. 
> आता अभिनेता संजय दत्तसुद्धा रासपचा प्रचार हेलिकाॅप्टरनेच करणार आहे.