आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection : भाजपकडून सर्व २८८ मतदारसंघांसाठी चाचपणी; फडणवीसच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही - व्यास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती होणार असली तरी भाजपकडून राज्यातील सर्वच्या सर्व २८८ जागांवर संभाव्य उमेदवार कोण असणार याची चाचपणी सुरू झाल्याची माहिती भाजपचे प्रवक्ते व आमदार गिरीश व्यास यांनी नागपुरात बोलताना िदली. भाजपकडून प्रदेशनिहाय मतदारसंघांचा आढावा सुरू आहे. सर्व २८८ जागांवर चाचपणी सुरू आहे. त्यासाठी भाजपने सर्वेक्षणही सुरू केले असून त्यातून आलेल्या माहितीच्या आधारेच पक्ष उमेदवारांबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती देताना व्यास म्हणाले, शिवसेनेशी युती होणार असली तरी भाजपला पक्ष या नात्याने प्रत्येकच मतदारसंघाची माहिती व नियोजन करणे क्रमप्राप्त आहे. लोकसभेच्या निवडणुकीतही भाजपने सर्व ४८ मतदारसंघांचा आढावा घेतला होता. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री कोण होणार, हा प्रश्नच उरलेला नाही. भ्रष्टाचाराचा एकही आरोप न होऊ देता या सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केलेला आहे. त्यामुळे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राहणार आहेत. त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही आमदार व्यास यांनी सांगितले.
 
 

बातम्या आणखी आहेत...