आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection :  बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार विलास तरे ‘शिवबंधनात’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभा मतदारसंघातले विद्यमान आमदार विलास तरे यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून तरे यांचा पक्षप्रवेश करवला. विलास तरे सलग दोन वेळा विरारचे बाहुबली नेते हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडून बोईसर विधानसभा क्षेत्रातून निवडून आले आहेत. तरे यांच्या प्रवेशामुळे शिवसेना पालघर लोकसभा मतदारसंघातील आपले वर्चस्व वाढवण्याच्या प्रयत्नात यशस्वी होत असल्याचे दिसून येते. बविआची वसई-विरार या पट्ट्यात मक्तेदारी झाली आहे. आता ठाकूर यांचे प्रमुख समजले जाणारे तरे यांनी त्यांना सोडले आहे. त्यामुळे मोदी लाटेचा काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरच बविआसारख्या स्थानिक छोट्या पक्षांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...